एरंडोल तालुक्यात भागवत भिकन पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा



एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील राजकीय वातावरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष व भावी जिल्हा परिषद सदस्य भागवत भिकन पाटील यांचे नाव मोठ्या चर्चेत आहे. विशेषतः उत्राण-तळई गटातून पाटील यांना मजबूत स्थानिक पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात असून, येत्या काळातील तालुक्यातील राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे दिसत आहे.


भागवत भिकन पाटील हे माजी मंत्री सतीश आण्णा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक पातळीवर त्यांनी सातत्याने कार्य करत गट-तळई पातळीवर आपला मजबूत जनाधार निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांत सहभाग घेत त्यांनी कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे.


तालुक्यातील अनेक ठिकाणी पाटील यांच्या संपर्काचे जाळे निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रतिमा एक प्रामाणिक व मेहनती नेतृत्व म्हणून आहे. यामुळेच आगामी राजकीय समीकरणांमध्ये त्यांचे नाव पुढे सरसावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सध्या त्यांच्यावर एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी आहे. तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचे कार्य ते सातत्याने पार पाडत असून, कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.


स्थानिक राजकारणात येणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, एरंडोल तालुक्यातील पुढील राजकीय दिशा ठरवण्यात भागवत भिकन पाटील यांचे नाव निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.