*पाचोरा पोलिसांची यशस्वी कारवाई...*
(पाचोरा) गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एक इसम अटक
पाचोरा, दि. २२ सप्टेंबर २०२५ — पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा टाकला आणि संबंधित इसमास ताब्यात घेतले.
छाप्यात पोलिसांनी एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, स्टील मॅग्झीन व हिरो होंडा मोटारसायकल असा एकूण रु. ७३,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव समाधान बळीराम निकम (वय ३७ वर्षे, रा. जाधववाडी, पाचोरा, मूळ रा. अंजाळा, ता. यावल) असे आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ४६२/२०२५, शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. कृष्णा घायाळ करत आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शस्त्र, चोरी, मारहाण, विनयभंग, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, आणि त्यांच्या पथकाने केली.
सदर पथकामध्ये सफौ/२६५८ रणजित पाटील, पोहेकॉ/०६२५ राहुल शिंपी, पोकॉ/१२३० योगेश पाटील, पोकॉ/१४२२ शरद पाटील, पोकॉ/३२६३ गणेश कुवर, पोकॉ/०१३२ श्रीराम शिंपी यांच्यासह स्थानीय गुन्हे शाखेचे पोहेकॉ/२१६३ लक्ष्मण पाटील, पोहेकॉ/१५२३ राहुल पाटील, पोकॉ/००८३ जितेंद्र पाटील, पोकॉ/१६५५ भुषण पाटील यांचा समावेश होता.
पाचोरा पोलीस ठाण्याची ही कारवाई गुन्हेगारी कारवायांना आळा घालणारी ठरली आहे

0 Comments