* पाचोरा नगरपरिषदेतर्फे बस स्टँड रोडवरील मानसिंगका मिल परिसरातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम संपन्न*
*पाचोरा:-* (प्रतिनिधी) गेल्या आठवडयापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहराचे जनजिवन पुर्णपणे विस्कळीत झाले होते. यामुळे नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने व झालेल्या पावसाने शहरातील बस स्टँड परिसराकडे जाणाऱ्या मानसिंगका मिल गेट पासून पुढे मुख्य नाल्याच्या आसपास नैसर्गीक पाण्याचा प्रवाह अडवून त्यावर पक्के ढापे टाकून अतिक्रमण केलेले होते त्यामुळे नाल्याचे पाणी पुर्ण क्षमतेने वाहून जाऊ शकत नसल्याने परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी जाऊन घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले होते त्या पार्श्वभुमीवर दिनांक 24/09/2025 रोजी नगरपरिषदेने अतिकमण मोहीम राबवून नाल्याच्या काठावरील सर्व अतिक्रमीत टपऱ्या, गटारीवरील ढापे पुर्णपणे काढून टाकत नाला मोकळा करण्यात आलेला आहे.
यामुळे परिसरातील नागरीकांकडून सदरच्या अतिक्रमण मोहीमेचे स्वागत करण्यातआले असून यापुढे नागरीकांनी नाल्याच्या आसपासच्या परिसरात अतिक्रमण / ढापे न टाकण्याचे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले आहे. सदरची अतिक्रमण मोहीम मुख्याधिकारी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 वाजेपासून सुरु करण्यात येऊन दुपारी उशिरापर्येंत मोहीम राबवून नाला मोकळा करण्यात आलेला आहे.
तसेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणे नागरीकांनी तात्काळ स्वत:हून काढून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री.देवरे यांनी केले आहे.

0 Comments