जि.प. कन्या शाळेच्या शिक्षिका भारती खैरनार यांचा निरोप समारंभ..
पाचोरा . येथील खडकदेवळा प्रशासकीय बदलीने जि प कन्या शाळा पाचोरा येथे बदलीने गेलेल्या शिक्षिका भारती खैरनार यांचा निरोप समारंभ आज जि प शाळा खडकदेवळा खुर्द येथे करण्यात आला, यावेळी शाळेच्या वतीने खैरनार यांना भेट देण्यात आली. भारती खैरनार यांनी त्यांच्या इयत्ता 4 थी च्या सर्व 32 विद्यार्थ्यांना शालेय बॅग भेट म्हणुन दिली. मुलानी व सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी नविनच हजर झालेले शिक्षक राजू रामा पाटील यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पाटील सर, रवींद्र शिंदे, अजित चौधरी, संध्या पाटील व सोपान तेली यांनी मनोगत व्यक्त केले

0 Comments