*नगरदेवळा येथील जेष्ठ शिवसैनिक अविनाश आबा कुडे यांना पंचायत समितीला उमेदवारी देऊन पक्षाने त्यांचा यथोचित सन्मान करावा....* 



नगरदेवळा प्रतिनिधी: सोनु परदेशी


आज जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून येत्या दिड दोन महिन्यांत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून होण्याची शक्यता असली तरी पाचोरा भडगांव मतदारसंघात शिवसेना स्वबळावर लढण्याचा तयारीत आहे. नगरदेवळ्यात सध्यातरी अनेक इच्छुक उमेदवारीसाठी आपापल्या नेत्याकडे फिल्डिंग लावतांना दिसत आहेत. पंचायत समितीत सुमारे 3 वर्षापासुन प्रशासकराज आहे. विविध कारणांनी निवडणुक प्रक्रिया लांबली. सदस्य, लोकप्रतिनिधी नसल्याने सरपंच, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पुढाऱ्यांना अडचणी आल्या. आपापली कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे चकरा माराव्या लागल्या. प्रशासनानेच अंदाजपत्रक, कामे, मंजुऱ्या, निधी याचे काम केले परंतु गेल्या काही महिन्यात निवडणुका लागत असल्याने इच्छुक मंडळी लोकांच्या भेटीगाठी घेऊन वातावरण निर्मिती करतांना दिसत आहेत. मात्र जनतेत जो संपर्कात आहे, सुखदुःखात कामी येतो, लोकांचे प्रश्न सोडवितो, उच्चशिक्षित आहे त्यालाच संधी देऊ अश्या चर्चा सुरू झाल्या असुन *काही संधीसाधू जातीय कार्ड खेळुन आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.*

नगरदेवळ्यातील अविनाश आबा कुडे हे गेल्या 36/37 वर्षापासून (माजी आमदार कै. आर ओ पाटील यांच्या कार्यकाळापासून) शिवसेनेत एकनिष्ठ असुन पक्षाने दिलेली जबाबदारी चोख व प्रामाणिकपणे पार पाडत असतात.गेल्या 30 वर्षा पासून होत असलेल्या प्रत्येक निवडणूकीत ते अतिशय सक्षम पणे गटाचे निवडणूकीचे नियोजन सांभाळत असुन ते कुशल संघटक, यशस्वी पत्रकार व शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जातात. कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे अविनाश कुडे यांनी आजपर्यंत शिवसेनेत उपतालुका प्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख या महत्त्वाच्या पदांवर काम केले असुन आता ते गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक व गुरूदत्त पत संस्थेचे चेअरमन म्हणुन काम बघत आहेत.

*अविनाश कुडे यांना उमेदवारी संदर्भात  विचारले असता त्यांनी संगीतले की मी शिवसेनेचा गेल्या 37 वर्षापासून प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. सत्ता असतांना, नसतांना पक्षाच्या माध्यमातून कायम गोरगरीब जनतेला न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या सुख दुःखात धाऊन गेलो. जर पक्षाने (जात न बघता) उमेदवारीची संधी दिली तर अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळेल व नक्कीच संधीच सोने करेल असे सांगितले.* तरी अविनाश आबा कुडे यांच्यासारख्या जेष्ठ शिवसैनिकाला येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांना प्रशासकीय कामकाजात असलेला अनुभव व त्यांच्या जवळ असलेले संघटन कौशल्य पाहता शिवसेना पक्षाने उमेदवारी देऊन त्यांचा अथोचित सन्मान करावा अशी भावना जनमानसातून व शिवसैनिकांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.