*पाचोरा भाजपा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे एकाने मागीतली ३० लाखांची खंडणी , पोलीसात गुन्हा दाखल..*



 पाचोरा (किशोर रायसाकडा) 

: ऑनलाईन फसवणुकीचा आणखी एक बळी; ३ लाख रुपयांची फसवणूक

पाचोरा प्रतिनिधी │ दिनांक ९ ऑक्टोबर २०२५

पाचोरा शहरातील वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी (वय ३८, रा. भडगाव रोड, पाचोरा) या महिलेस ऑनलाईन फसवणुकीचा बळी बनविण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४७४/२०२५ भा.दं.वि. कलम ३०८(१), ३०८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, काही अनोळखी व्यक्तींनी स्वतःला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोगाशी संबंधित अधिकारी, तसेच Income Tax, CBI, ED इत्यादी विभागांशी जोडलेले असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी विविध बहाण्यांनी ऑनलाईन व्यवहारांद्वारे सुमारे ₹३,००,००० इतकी रक्कम लाटली.

फिर्यादींना आरोपींनी मोबाईलवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. व्यवहारानंतर संशय आल्याने त्यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणत्याही अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या ऑनलाईन लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.”