*जिल्हाचे लक्ष तांदलवाडी ऐनपुर गटावर !*
मनोहर कोळी रावेर प्रतिनिधी :
रावेर तालुक्यातील सहा गटापैकी एकमेव जिप गट हा खुला राहिल्यामुळे अनेक दिग्जनांना मोठा धक्का बसला आहेत . या गटात भाजपा सेना युती होती की नाही हा एक मोठा प्रश्न आहेत . तसे न झाल्यास या जि.प गटासाठी फार भाजपात फार रस्साखेच होणार आहेत यात नंदकिशोर महाजन यांची पत्नी सारिका ताई महाजन , श्रीकांत महाजन यांची पत्नी शितल ताई महाजन तसेच हरिलाल कोळी यांची पत्नी कविता ताई यानी पण पचायत समीती सभापती पद भुषवल आहे
या तीन्ही मध्ये रस्सीखेच होऊ शकते यात मागील निवडणुकीमध्ये श्रींकात भाऊ महाजन यांचा नंदुभाऊच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. बहुतेक नंदुभाऊ आता श्रीकांतभाऊ यांना संधी देतील व ते विधान परिषद साठी आगेकुच करतील असे वाटते यावरून वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहेत. शिवसेने तर्फे एकमेव जिप साठी दिनेश पाटील यांची पत्नी सविता पाटील याची चर्चा आहेत .
तांदलवाडी गणातुन भाजपातर्फे हरीलाल कोळी भाजपात नव्याने प्रवेश मा जि प सदस्य आत्माराम कोळी , मदार पाटील यांची सुद्धा वर्णी लागु शकते. जर तांदलवाडी जिपचे उमेदवार शितल ताई महाजन किंवा सारीका ताई .महाजन यांना उमेदवारी दिली तर गणात हरिलाल कोळी यांना उमेदवारी मिळु शकते. तसेच शिवसेने तर्फे योगेश्वर कोळी , संतोष महाजन , संतोष पाटील या नावाची चर्चा चालु असुन यात योगेश्वर कोळी उमेदवार राहु शकतात . सर्व जातीय समीकरण जर पाहिले तर सपूर्ण गटात व गणात कोळी समाजाचे मते हे जास्तीचे व निर्णायक आहेत म्हणून कोळी समाजाचा उमेदवार कोणत्याही पक्षाला देणे गरजेचे आहे. गुजर ,कोळी , मराठा असे समिकरण उदयास येवु शकते. पण शिवसेना भाजपा युती झाली तर कोण बाजी मारेल हे सांगणे आता तरी सांगता येणार नाही . ऐनपुर गणातून भाजपा कडून शुभम पाटील यांच्या मातोश्री , विजय अवसरमल च्या पत्नी , सेनेकडून प्रगतीशिल शेतकरी सुनिल महाजन यांच्या पत्नी , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किशोर पाटील , सरपंच अमोल पाटील यांच्या सौभाग्यवती राहु शकतात . जिप ची खरी निवडणूक ही भाजपा सेना यांच्यात लढली जाईल असे चित्र आज तरी दिसत आहेत . कारण कॉग्रेस , राष्ट्रवादी कॉगेस यांचे उमेदवार कोण राहील हे आज तरी दिसत नाही . कोणाचे पारडे जड आहे याला आज तरी सांगता येणार नाही कारण सर्व उमेदवार हे तोलामोलाचे आहे. आजतरी मतदार संघात नव्या चेहरांना व तरुणांना संधी मिळेल असे दिसत आहे. यावेळेस मात्र ऐनपूर तांदलवाडी गटावर संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले आहेत .

0 Comments