*चाळीसगाव नगरपालिका संदर्भात शिवसेनेची जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न संपन्न...*





*चाळीसगाव नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात आज हॉटेल ब्रिज कॉर्नर येथे शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की मा. नामदार गुलाबराव पाटील साहेब, आमदार किशोर पाटील, शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव नगरपालिका निवडणूक लढवली जाणार आहे . तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या वार्डात ताकतीने उत्साहात प्रचारात सहभागी व्हावे प्रत्येकाने होम टू होम जाऊन शिवसेनेचा धनुष्यबाण लोकांपर्यंत पोहोचवावा व माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या जेणेकरून आपल्याला ती मदत होईल वार्डातल्या सर्व लाडक्या बहिणींना भेटून आशीर्वाद घ्यावेत प्रचारात अग्रस्थानी राहावे. अशा सूचना देखील दिल्या, येणाऱ्या दोन-तीन दिवसात युती संदर्भात अंतिम निर्णय जिल्ह्याचे नेते मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब घेतील तो आपणा सर्वांना मान्य असेल .*


     *तोपर्यंत सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या व बाजूच्या वार्डात सर्व मतदार बंधूंना भेटून आशीर्वाद घ्यावेत जेणेकरून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील यासाठी काम करावे अशा सूचना दिल्या त्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी, युवासेना शहरप्रमुख शुभम राठोड, शेखर गवळी संजय पाटील प्रतिभा पवार मनीषा महाजन अनिता शिंदे सुवर्णा राजपूत कल्पना शेजवळ आशा पाटील सागर पाटील दिलीप पाटील विजय पाटील आबा पाटील विशाल धनगर विनोद जाधव जय राजपूत दिनेश कासार इकबाल पठाण शकील मुल्ला आकाश पाटील सोपान गुंजाळ पवन सैंदाणे हर्षल पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते...*