*भातखंडे येथील घरफोडी करणाऱ्यास मुद्देमालासह अटक= पाचोरा पोलिसांची कारवाई*



येथील भातखंडे खुः ता.पाचोरा जि. जळगाव येथे घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करून 41,500/-रु किमतीचा मुददेमाल अवघ्या 04 तासात जप्त (पाचोरा पोलीस स्टेशनची कारवाई)


जळगाव जिल्हयामध्ये चोरी, घरफोडीचे गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी  यांनी श्री. राहुलकुमार पवार पोलीस निरीक्षक पाचोरा यांना सुचना दिल्या होत्या.


दिनांक 10/11/2025 रोजी फिर्यादी सोपान भिकन कुमावत वय 51 वर्ष रा. भातखंडे खुः पाचोरा जि. जळगाव यांनी दिनांक 10/11/2025 रोजी फिर्यादी हे लग्नानिमीत्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरी अज्ञात चोरटयांनी आर्थिक फायदयासाठी घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन 41,500/- रु किमतीची रोख रक्कम चोरी केलेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन गुरन 530/2025 भारतीय न्याय सहोता 2023 चे कलम 331 (1) अन्वये गुन्हा दाखल केला होता.


दिनांक 10/11/2025 रोजी अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, आरोपी कन्हैय्या विनोद कुमावत वय 25 रा भातखंडे खुः ता पाचोरा जि. जळगाव याने चोरी केलेबाबत संशय असल्याने त्याचा शोध घेत भातखंडे खुः येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाच्या अनुषंगाने भरवशात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयातील चोरी केलेला एकुण 41,500 रु किमतीचा मुददेमाल सदर आरोपीकडुन जप्त करण्यात आलेला आहे.


सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार, सपोनि संजय निकुंभ, पोना/महेंद्र पाटील, तुषार विसपुते, पोकॉ संदीप राजपुत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंपी, संतोष राजपुत, अनिल पवार यांनी केली आहे.