*रहस्यमय बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींना २५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनी राजस्थानातून घेतले ताब्यात*



तीन आरोपींविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


भडगाव प्रतिनिधी 


 भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातुन ०३ अल्पवयीन मुली दि-२०/१०/२०२५ रोजी  बेपत्ता झाल्याचे समजुन आल्याने बेपत्ता मुलीचे नातेवाईक यांनी गावात तसेच आजुबाजुच्या परिसरात सदरील बेपत्ता मुलींचा शोध घेतला असता मुलींबद्दाल काही एक माहीती मिळुन न आल्याने शोध घेत असतांना नमुद गावातील फिर्यादीची पुतणी देखील बेपत्ता झाल्याचे समजुन आल्याने दि-२०/१०/२०२५ रोजी भडगाव पोलीस स्टेशन येथे येवुन फिर्यादीने फिर्याद दिल्यावरुन गुरन-३८०/२०२५ व गुरन-३८१/२०२५ बि एन एस कलम-१३७ (२) प्रमाणे ०२ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. तसेच एका गावातून व एकाच कुटुंबातुन ०३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने गावात व आजुबाजुच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.


सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्ह्या बाबत तात्काळ बारकाईने तपास करण्याच्या सुचना दिल्या त्या अनुषंगाने नमुद बेपत्ता मुली यांचे सर्वांचे मित्र/मैत्रीनी, नातेवाईक इत्यार्दीकडे कसुन चौकशी केली असता चौकशीमध्ये जवळपासच्या परिसरातील ०३ तरुण मुले सुध्दा बेपत्ता झाल्याचे तपासात तनिष्पन्न झाले. सर्व मुलामुलींचे मोबाईल सुद्दा बंद होते तरी तपासाचे गांभीर्य लक्षात घेता ०२ वेगवेगळे पथक तयार करुन ०१ पथक जळगाव तसेच ०१ पथक चाळीसगाव साईडला रवाना केले जळगाव येथील पथकाला रेल्वे स्टेशन येथील सि सी टी व्ही फुटेज मध्ये संशयीत मुले व बेपत्ता मुली दि-२०/१०/२०२५ रोजीचे रात्रीचे ०१.२२ वा दरम्यान रेल्वे स्टेशनच्या टिकीट घराच्या सि सी टि व्ही फुटेज मध्ये दिसुन आले.त्या अनुषंगाने रेल्वे स्टेशन मध्ये नमुद कालावधीत किती ट्रेन ये जा करतात याची माहीती घेतली असता सदर कालावधीत झेलम एक्सप्रेसने ते गेल्याचे समजले संशयीत ०३ बेपत्ता मुलामुलींचे नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांचे ज्या ठिकाणी नातेवाईक राहतात त्यांचे नाव व मोबाईल नंबर हस्तगत करुन त्यानुसार पुढील तपास सुरू केला.


सदर गुन्हयाच्या बाबतीत कुठलाही सुगावा नसतांना तांत्रिक बाबींची योग्य रित्या मदत घेवुन संशयीतांच्या नातेवाईकांकडे कसुन चौकशी करुन नमुद गुन्ह्यांत आरोपी क्र.१) रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे २) अजय सुकलाल देवडे ३) अमोल इश्वर सोनवणे यांना राजस्थान राज्यातील अलवर जिह्यातुन आणले. व तिनही अल्पवयीन मुलींची सुखरुप सुटका केली सदरील गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक डॉ. मेहश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा,पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, पो.हे.काँ.पांडुरंग पाटील, पो.ना.मनोहर पाटील, पो.काँ.महेंद्र चव्हाण, पो.काँ.प्रविण परदेशी, पो.काँ.मिलींद जाधव, म.पो.का. सो.नि. सपकाळे इत्यादींनी गुन्हयाचा योग्य रित्या तपास लावला.

तसेच पालकांनी आपल्या मुला-मुलींन कडे लक्ष ठेवावे असे जळगाव पोलीसांना आवाहन केले

आहे.