*त्या नराधमास फाशी द्या= सकल हिंदू समाज पाचोरा यांची मागणी*
डोंगराळे (ता. मालेगाव) येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची सकल हिंदू समाजाची मागणी
डोंगराळे, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुरडीवरील अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या भीषण घटनेने समाजमन संतप्त झाले असून, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पाचोरा सकल हिंदू समाजातर्फे पाचोरा पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन, चार वर्षाची चिमुकली वर बलात्कार करून तिची हत्या केलेला आरोपीला अटक करून , अशा घृणास्पद कृत्यास जबाबदार असणाऱ्या आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार सर्वात कठोर कारवाई करून, न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी हिंदू सकल समाज पाचोरा यांनी मागणी केली आहे.

0 Comments