नगरदेवळा साॅमील कायम स्वरुपी बंद करा = लहुजी सेनेची वनपरिक्षेत्र पाचोराकडे तक्रार 



(फिरोज देशमुख)  नगरदेवळा येथील जहागीरदार साॅमील यांची अवैध लाकुड साठा व अवैध लाकुड वाहतूक संदर्भात लहुजी सेनेचे प्रदेश अध्यक्ष गुरूदास भालेराव यांची पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.

नगरदेवळा येथील जहागीरदार साॅमील मध्ये ओल्या लाकडाचा अवैध रित्या साठा करून त्या ठिकाणी रात्रंदिवस अवैध लाकुड कापण्याचे मशीन सुरू असते त्यामुळे कर्कश आवाज त्यातून निघणारा भुसा हा हवेत उडतो व त्याचा त्रास नागरिकांना होतो असे निवेदन पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.तसेच संबंधित साॅमील कायम स्वरुपी बंद करावी व लाकुड साठा जप्त करावा व गुन्हा दाखल करण्यात यावा असेही तक्रारी अर्जात म्हटले आहे सदर तक्रार पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव, पाचोरा तहसीलदार, पाचोरा पोलीस निरीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर लहुजी सेनेचे प्रदेश अध्यक्ष गुरूदास भालेराव, जिल्हा अध्यक्ष संदीप चव्हान यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.