कोण? मंगेश चव्हाण?
जळगाव जिल्हा परिषद सदस्य पदमसींह पाटील
पाचोरा शहराच्या राजकारणात अलीकडच्या काळात वारंवार चर्चेत आलेले नाव म्हणजे मंगेश चव्हाण. मात्र हे नाव चर्चेत येण्यामागे विकासकामांचा धडाका आहे का, की केवळ राजकीय कुरघोड्या—हा प्रश्न आज पाचोरेकरांच्या मनात आहे. पाचोऱ्याच्या नगरपालिका निवडणुकीशी त्यांचा नेमका संबंध काय आणि शहराच्या विकासात त्यांचे ठोस, दिसणारे योगदान काय, हे आजही अनेकांना काहीच समजलेले नाही.
विशेष म्हणजे पाचोरा शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत असतांना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य व इतर मुलभूत नागरी सुविधा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. अशा वेळी विकासाला हातभार लावण्याऐवजी, जाणूनबुजून अडथळे निर्माण करणे, अपप्रचार करणे, संभ्रम पसरवणे किंवा समाजमाध्यमांवर केवळ राजकीय स्टेटस टाकून वातावरण तापवणे—यामागचा उद्देश नेमका काय, असा थेट सवाल सुज्ञ माजी जिल्हापरिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीआधी शहराच्या प्रश्नांवर मंगेश चव्हाण कुठेही ठोसपणे सक्रिय दिसले नाहीत. निवडणूक संपल्यानंतरही ते प्रत्यक्ष कामात दिसणार नाहीत, अशीच चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे पाचोरेकरांचा सूर ठाम आहे.
पाचोऱ्याला हवेत काम करणारे, मैदानात उतरून प्रश्न सोडवणारे नेते, फक्त सोशल मीडियावर स्टेटस टाकून श्रेय घेणारे नव्हे, आणि दिशाभूल करून राजकारण पेटवणारे तर मुळीच नव्हे!
पाचोऱ्याच्या विकासाचे वास्तव पाहिले तर, शहरालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात विकासाची गंगा आणणारे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे कार्य जनतेसमोर स्पष्ट आहे. त्यांच्या नावावर खडे फोडून, त्यांच्या कार्यावर टीका करून कुणीही मोठे होऊ शकत नाही आणि होणारही नाही, हे पाचोरा–तालुक्याच्या जनतेने वेळोवेळी दाखवून दिले आहे असे मत पदमसिंग पाटील यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
पाचोरा शहर व तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने जनतेचा विश्वास गमावला असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. त्यामुळेच फाटक्या घोंगडीत थंडी वाजायला लागल्यावर जशी उब हवी वाटते, त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत उब मिळवून घेण्यासाठी पहिल्यांदाच बाहेरचे मंत्री आणि आमदार पाचोरात आणून आपली इभ्रत वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे मत पदमसिंग पाटील यांनी व्यक्त केले असून तशी चर्चा रंगू लागली आहे.
मात्र पाचोरा शहर आणि तालुक्याची जनता भोळी नाही.
आजचा मतदार जागरूक आहे. तो घोषणांपेक्षा काम पाहतो, भाषणांपेक्षा परिणाम पाहतो, आणि आरोप, प्रत्यारोपांपेक्षा विकासाची दिशा ओळखतो. म्हणूनच अनेकांचे मत असे आहे की, २०२९ नंतर मंगेश चव्हाण यांची ओळख ‘माजी आमदार’ इतकीच उरेल आणि तीही जनतेच्या प्रगल्भ, जागरूक व विकासाभिमुख निर्णयामुळे हे मात्र नक्की अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माजी जिल्हापरिषद सदस्य, शिंदे सेनेचे उपजिल्हा संघटक, पदमसिंग पाटील व पाचोरा शहरातील सुज्ञ नागरिक.

0 Comments