पाचोरा शहरात प्रचारात थंडीत एकमेकांवर ज्वलंत तोफांचा भडीमार 



पालिका निवडणुकीत चुरस; शाब्दीक कुरघोडीमुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले



पाचोरा =येथील पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १४ प्रभागांतील २८ सदस्य निवडीसाठी होणार होते मात्र २६ च सदस्यसाठी निवड येत्या २ डिसेंबरला मतदान होत आहे.

प्रभाग क्रमांक ११(अ) प्रभाग क्रमांक १२ (ब) या दोन जागांचे मतदान स्थगित करुन पुढे ढकलण्यात आले आहे त्यानिमित्त सुरू झालेला प्रचार अंतिम टप्प्यात आला. त्यात आरोप-प्रत्यारोप, शाब्दीक कुरघोडी यामुळे प्रचार तोफांची दाहकता प्रचंड वाढीस लागली. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तपायला लागले आहे.



या निवडणुकीत प्रचारासाठी अत्यल्प अवधी देण्यात आला. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी चिन्हाच्या आधारे प्रचार केला. परंतु, अपक्षांना बुधवारी (ता. २६) चिन्ह मिळाल्याने चिन्हासह प्रचाराला पाच दिवसांचा अवधी मिळाल्याने प्रचारास गती मिळाली आहे.


*आरोप-प्रत्यारोप शिगेला*


आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे, तर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात भाजपचे उमेदवार लढत आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

वाढत आहेत. आतापर्यंत केलेली विविध विकासकामे आमदार किशोर पाटील यांच्या प्रचाराचा मुद्दा असला तरी याच विकासकामांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. पाणीपुरवठा, बेरोजगारी, अस्वच्छता, ठेकेदारी हे मुद्दे प्रचारात आहेत.


*नेत्यांच्या सभा*


भाजपच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ येथे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भडगावला जाहीर सभा झाली. मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे प्रचारार्थ सतत संपर्कात आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली.


*आमदार पुत्र रिंगणात*


(आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील हे प्रभाग ९ 'अ'मधून व माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भूषण वाघ प्रभाग १ 'ब'मधून निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुतणे व 'पीटीसी'चे चेअरमन संजय वाघ यांचे पुत्र सूरज वाघ हे १० 'अ'मधून रिंगणात उतरले आहेत. तीन माजी नगरसेवकांनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात आणले आहे.)


*प्रचाराचे मुद्दे*


प्रचारात स्थानिक मुदयांवरच भर दिला जात असून, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाचे भाजपचे व्हिजन मतदारांपुढे मांडले जात आहे. आमदार किशोर पाटील हे दहा वर्षाच्या कारकीर्दीत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा व भविष्यातील परिपूर्ण विकासाचे व्हिजन मतदारांपुढे मांडत आहेत. प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, डिजिटल बॅनर, विविध वाहनांमधून पक्षाच्या संदर्भात रचण्यात आलेली गाणी वाजवून, प्रचारफेरी, प्रत्यक्ष संपर्क साधून प्रचार केला जात आहे. नगराध्यक्षपदासाठी आमदार किशोर पाटील


*तोडीस तोड उमेदवार*


(शिवसेना, भाजपने तोडीस तोड उमेदवार दिल्याने सर्वच उमेदवारांकडून साम, दाम, दंड, भेद या चतुःसूत्रीचा वापर करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रचारास आजचाच दिवस बाकी असल्याने प्रवार तोफांची दाहकता कमालीची वाढली आहे. ही दाहकता कोणाला तारक व मारक ठरते, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, यात शंका नाही.)


यांच्या पत्नी सुनीता पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांच्यात सरळ लढत जुंपली आहे.


*माजी नगरसेवक मैदानात*


माजी नगराध्यक्ष असलेले सुनीता पाटील व संजय गोहिल हे पुन्हा रिंगणात आहेत. प्रभाग १ 'ब'मधून माजी नगरसेवक भूषण वाघ व किशोर बारवकर, प्रभाग २ ,अ'मधून संजय गोहिल लवत आहेत. यांच्यासह १० माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने लढती रंगतदार होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.