*भाजपात राष्ट्रवादी तुन  प्रवेश करणारे मा. आमदार अरुणदादा पाटील यांना पक्षा तर्फे दुय्यम स्थान* 





(मनोहर कोळी) रावेर येथील तालुक्याचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता जाऊन तिथे भाजपला सभापती पद मिळाले. हे  समाजिक समिकरण घडवुन येण्यामागे  माजी आमदार अरुण पाटील यांचा सिंहाचा वाटा होता . तसेच आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुका महिनाभरात होणार आहे. तर त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यात ही त्यांच्याच जिप गटातील प.स. उमेदवार आदीच जाहिर झाल्याची जोरदार चर्चा गटात आहे. तरी दरम्यान दोन महिन्यापूर्वी  भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार अरुण पाटील यांना मात्र स्थानिक पक्षपातळीवर सातत्याने दुय्यम स्थान दिले जात असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनावरून दिसून येते. त्यामुळे  पाटील यांच्या समर्थक व हितचिंतकांमध्ये पक्षाबद्दल नाराजी पसरली आहे.


नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष व आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना बोलवविण्यात आले नव्हते. तसेच कार्यकर्त्यांनी दिवाळीनिमित्त शहरात लावलेल्या बॅनरवर  पाटील यांना स्थान देण्यात आले नव्हते. लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टेशनवर झालेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरही त्यांचा फोटो टाकण्यात आला नव्हता. तसेच आज प्रसारित करण्यात आलेल्या तीर्थ क्षेत्र विकासासाठी 50 लाख या बॅनरवर ही माजी आमदार अरुण पाटील यांना स्थान देण्यात आलेले नाही.पक्षाच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांतर्फे वारंवार होणाऱ्या या घटनामुळे माजी आमदार अरुण पाटील यांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. रावेर तालुक्यातील मराठा समाजावर  पाटील यांची पकड असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र पक्षातर्फे दुय्यम स्थान मिळत असल्याने त्याचा येणाऱ्या निवडणुकांवर निश्चित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत माजी आमदार अरुण पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल दाखवत होता. भाजपाचे मंडळ अध्यक्ष यांना काहीही माहिती नाही का? त्यांचा फोटो असतो पण मा. आमदारांचा नसतो ? का जाणून बुजुन कोणाच्या सांगण्यावरून का ? मुद्दाम ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यापुढे काय घडामोडी या बाबत तालुक्याचे लक्ष लागून आहे.