*शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या विरोधात आज उपोषण* 



 *आज आंदोलन : शिक्षकांच्या मागण्या ऐरणीवर* 


 

(सोनु परदेशी) शिक्षकांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद न देणे, कार्यालयात पूर्णवेळ = हजर न राहणे यांसह विविध अडचणी शिक्षकांना येत असल्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या विरोधात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ११ डिसेंबरपासून - जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ जळगावद्वारा जळगाव जिल्हा - माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा = मुख्याध्यापक संघातर्फे साकळी -उपोषण करण्यात येणार आहे.

 शिक्षणाधिकारी - कल्पना चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शिक्षकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या आहेत. विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्या सोबत झालेल्या सभेचे इतिवृत्त, शैक्षणिक व्यासपीठासोबत जुलै महिन्यात झालेल्या सभेतील निर्णय, - शैक्षणिक व्यासपीठाने विविध - विषयांबाबत नोव्हेंबर महिन्यात दिलेली सात पत्रे, शैक्षणिक व्यासपीठाने १ डिसेंबरला दिलेली तीन पत्रे हे मुद्दे - मांडले आहेत. गेल्या वर्षभरापासून एकही काम होत नसल्याने हे उपोषण

या आहेत प्रमुख मागण्या

शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. मागितलेली माहिती देत नाही.चर्चेत मान्य केलेली प्रकरणे सुद्धा मंजूर करीत नाहीत. वेतन पथकाकडून अपूर्ण माहिती दिली जाते. कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहत नाहीत. कार्यालयीन कामकाज कार्यालयातून न करता इतर ठिकाणाहून केले जाते. जिल्हाभरातून कामासाठी आलेले शिक्षक ताटकळत बसतात. कोणीही जबाबदार अधिकारी त्यांची दखल घेत नाही. टप्पा अनुदान आदेश वाटपात प्रचंड विलंब होत असून, त्यात सुधारणा व्हावी.

 जोपर्यंत परिपूर्ण माहिती व प्रलंबित प्रकरणे पूर्ण होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील, असे अध्यक्ष जे. के. पाटील, समन्वयक एस. डी. भिरुड, बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील, जयवंतराव पाटील, एच.जी. इंगळे, साधना लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व वरिष्ठ कार्यालयांना पत्र देऊन या संदर्भात कळवले आहे असेही ते म्हणाले.