*मावस काकाकडुन अल्पवयीन मुलगी गर्भवती, गर्भपात करणारा तो डॉक्टर कोण...!*
पाचोरा तालुक्यातील एका शांत गावावर काल एक हादरवून टाकणारा आरोपांचा भडका उसळला. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच नात्यातील मावस काकाने मे, जून २०२५ दरम्यान वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याचा आणि त्यातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने अक्षरशः संपूर्ण तालुका हादरला असून याच अत्याचातून ती गर्भवती राहिली होती. तसेच धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या काही नातेवाईकांनी आई, बाबा, काका आणि आजी यांनी मिळून पाचोर्यातील एका डॉक्टरकडे बेकायदेशीर गर्भपात करवून घेतल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे.
=========================================================
२०१९ च्या काळ्याकुट्ट आठवणी पुन्हा समोर.
=========================================================
पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत आणखी एक चकित करणारा खुलासा केला आहे. २०१९ मध्ये ती केवळ सातवीत शिकत असताना आरोपी मावस काका प्रवीण (राहणार ठाणे) याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केला होता.
=========================================================
कुटुंबातील सदस्यांवरही गुन्हे दाखल.
=========================================================
पीडितेच्या तक्रारीनंतर पाचोरा पोलिसांनी दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी मावस काकासह संबंधित कुटुंबीयांविरोधात गुन्हे दाखल केले. अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, विश्वासाचा गैरफायदा, तसेच बेकायदेशीर गर्भपातास मदत या सर्व गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील चौकशी सुरू आहे.
=========================================================
गर्भपात करणारा डॉक्टर कोण ? नागरिकांचा मोठा प्रश्न.
=========================================================
या घटनाक्रमात एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता पुढे सरकला आहे तो म्हणजे पाचोर्यातील तो डॉक्टर कोण, ज्याने अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला ? तसेच स्थानिक सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाला थेट मागणी केली आहे की, या डॉक्टरची ओळख स्पष्ट करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आरोग्य विभागाने याकडे केवळ प्रकरण म्हणून नव्हे, तर समाजाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहावे, अशी जोरदार भावना व्यक्त होत आहे.
=========================================================
गर्भलिंगनिदान चाचण्या अजूनही सुरू ? चिंतेची घंटा वाजली
=========================================================
सुज्ञ नागरिकांकडून अजून एक गंभीर मुद्दाही समोर आणला जात आहे, पाचोरा शहरात आजही गुपचूप गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याची चर्चा व्यापक आहे. या बेकायदेशीर प्रकारांची साखळी समुळ उखडून टाकण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन व पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिडीत तरुणीसाठी मानसिक व कायदेशीर मदतीची गरज
घडलेली घटना ही केवळ एक पोलिस केस नाही तर एका मुलीच्या आयुष्याशी खेळलेली क्रूर कथा आहे. त्यामुळे तिच्या पुनर्वसनासाठी मानसिक, वैद्यकीय आणि कायदेशीर सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिला संघटनांनी केली आहे.
या प्रकरणामुळे पाचोरा तालुका पेटून उठला असून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, बेकायदेशीर गर्भपात साखळीचा पर्दाफाश व्हावा आणि यापुढे अशा घटनांना पायबंद घालावा, अशी भूमिका सर्व स्तरांतून ठामपणे मांडली जात आहे.

0 Comments