ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप



* महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार ; आरोग्य, सन्मान व सुरक्षिततेचा संदेश


नगरदेवळा =[सोनु परदेशी] तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी ए. टी. गुजराथी कन्या माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथे एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने शाळेतील 80 ते 90 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास मिलिंद सोनवणे सर, अनिल काटकर सर, संपत वानखेडे सर, राजपूत सर, परदेशी सर, मुख्याध्यापक गणेश खैरनार सर, योगेश पाटील, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत पाळी स्वच्छतेबाबत उघडपणे चर्चा होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.



याप्रसंगी बोलताना अभिलाषा भिला रोकडे यांनी महिला व तरुणींच्या आरोग्य व सन्मानासाठी आपली ठाम भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, महिला व तरुणींच्या शारीरिक स्वच्छता, सन्मान व आरोग्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.


महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा व परिसरातील सर्व गावांतील शाळा व महाविद्यालयांमध्ये कॉईन पॅड व्हेंडिंग मशीन बसविणे, सॅनिटरी पॅड वितरण मोहीम, पिरीयड स्वच्छता जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, पॅड डिस्पोज मशीन, गुड टच – बॅड टच जनजागृती शिबिरे आदी उपक्रम राबविण्याचा त्यांनी संकल्प जाहीर केला.