चाळीसगाव महावितरण कंपनी च्या कार्यालयासमोर बाह्य स्रोत कामगारांना कामावर घेण्यासाठी रयत सेनेचे आंदोलन
चाळीसगाव प्रतिनिधी - चाळीसगाव महावितरण कंपनी च्या कामकाजासाठी मेसर्स नेक्सन मल्टी सर्व्हिसेस कार्पोरेशन छत्रपती संभाजीनगर या ठेकेदाराला २०२५ ते २०२६ या वर्षासाठी बाह्य स्रोत कामगार भरती करण्याचा ठेका अधीक्षक अभियंता जळगाव यांनी दिला आहे मात्र ज्या बाह्य स्रोत कामगारांचे आय टी आय व इतर कागदपत्रे खरे आहेत अशा कामगारांना कामावर घेतले नसल्याने रयत सेनेच्या वतीने दि २९ रोजी चाळीसगाव महावितरण कंपनीच्या हिरापूर रोड स्थित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच येत्या २ दिवसात नियमात असणाऱ्या कामगारांना कामावर न घेतल्यास कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालाया समोरील हिरापूर रोडवर रयत सेनेच्या वतीने कामगारांच्या हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे,
नियमात असणाऱ्या कामगारांना कामावर न घेता डुप्लिकेट (खोटे) कागदपत्रे असणाऱ्या कामगारांना कामावर घेतले गेले आहे. संबंधित ठेकेदाराने बाह्य स्रोत डुप्लिकेट (खोटे) कागदपत्रे असणाऱ्या नवीन कामगारांना पैसे घेऊन भरती करण्यात आले आहे. आणि नियमात असणाऱ्या कामगारांना कामावर न घेता किंवा त्यांचा अनुभव न बघता मेसर्स नेक्सन मल्टी सर्व्हिसेस कार्पोरेशन छत्रपती संभाजीनगर या ठेकेदाराने भरती केले असल्याने अनुभवी कामगारांवर अन्याय केल्याने कार्यकारी अभियंता घुमरे यांना रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व कामगार हे प्रत्यक्ष भेटून कामगारांना कामावर घेण्यात यावे म्हणून वारंवार भेटून निवेदन देवून खरी परिस्थिती लक्षात आणून देऊनही कार्यकारी अभियंता नितीन घुमरे साहेबांनी ठेकेदाराला सूचना देवून कामावर न घेतल्यामुळे चाळीसगाव महावितरण कार्यालयाच्या समोर दि २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रयत सेनेच्या वतीने कामगाराच्या न्यायासाठी व त्यांना कामावर घेण्यात यावे यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले आंदोलन ठिकाणी घुमरे यांनी रयत सेनेची मागणी अधीक्षक अभियंता जळगाव व चाळीसगाव महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना सांगून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन दिले म्हणून आंदोलन स्थगित करण्यात आले, आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,प्रदेश सचिव प्रमोद वाघ प्रदेश समन्वयक पी एन पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर ,शहर अध्यक्ष प्रदीप मराठे, उपाध्यक्ष सतीश पवार, कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, संघटक शिवाजी गवळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, भूषण पाटील, भूषण बोरसे, मंगेश तांबे ,राहुल गरुड, केशव शिंदे, बाबू कुराडे, रोहित कुमावत,बंटी पाटील,हर्षल ठाकूर यांच्यासह रयत सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते,

0 Comments