*पुतणीवर अत्याचार करणाऱ्या काकाच्या पाचोरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!*
(पाचोरा प्रतिनिधी= गजानन पाटील)
अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाच्या पाचोरा पोलिसांनी आवळल्या मुसक्या मावस काकाला २६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
पीडीत ही अल्पवयीन असताना कल्याण येथे पोलिस दलात कार्यरत असलेल्या मावस काकाकडुन तिच्यावर अतिप्रसंग केला.नंतर पाचोरा तालुक्यातील एका गावात पीडीतेच्या घरी आल्यावरही अत्याचार करीत दमबाजी केली. होती त्यात पीडीता गर्भवती राहिली व नंतर गर्भपात झाला.पाचोरा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.पीडीत मुलगी ही आजी आजोबांजवळ रहात होती. कल्याण येथे असलेल्या मावस काकाकडे मे. जुन २०२५ च्या दरम्यान गेली. पिसाळलेल्या काकाने वरच्या रुमवर एकटीला गाठुन प्रथम तिचा शारीरिक विनयभंग केला.पीडीतेने त्या वेळेस ही विरोध केला.
त्यानंतर आरोपी नराधम काका हा पीडितेच्या गावी तालुक्यातील गावात आला व तेथे दोन तीन वेळा अत्याचार केला. त्यात ती गर्भवती राहिली होती. तेव्हा ती गर्भवती असल्याची सोनोग्राफी तपासणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता पाचोरा नराधम काकाच्या पाचोरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

0 Comments