*अनुदान घोटाळ्यात वकीलपत्र घेणारा स्वीकृत नगर सेवक मान्य नाही = मधुकर काटे*
भाजपा पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेत संताप
( किशोर रायसाकडा) नगरपरिषदेत शिवसेने विरोधात झालेला पराभव झाल्यापासून या पक्षात नेत्यांच्या मनमानी पद्धतीवर नाराजी उफाळून आली आहे . पाचोरा नगर परिषदेत झालेल्या पराभवाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी स्वीकारून भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पक्ष कार्यालयात भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सुर व्यक्त केला. अनेक वर्षांपासून पक्षासाठी जनतेशी संपर्कात पक्ष कार्यकरणारे जुन्या कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेणाऱ्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष मुंढे पाटील, बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, माजी तालुकाध्यक्ष हिंमतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष दीपक माने, माजी शहराध्यक्ष रमेश वाणी, दत्ता बोरसे पाटील, नंदूबापू सोमवंशी, समाधान मुळे, माजी पदाधिकारी डॉ. शांतीलाल तेली, प्रदीप पाटील,आदी
पत्रकार परिषदेत प्रचंड नाराजी व्यक्त करताना जिल्हा पदाधिकारी मधुकर काटे यांनी पक्ष भूमिका मांडताना सांगितले की, पक्षाने मागील काळात काही नेत्यांना पक्षात सामावून घेतले हा पक्षाचा अंतर्गत निर्णय होता. त्यांच्या नेतृत्वात नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव नगर पालिकेत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. ही माहिती आम्ही पक्षश्रेष्ठी, जिल्हाध्यक्ष, ना. गिरीश महाजन , आमदार मंगेश चव्हाण यांना दिली होती. मात्र नेत्यांनी निर्णय घेतला नाही. त्या मुलेच असा निकाल लागला .याचा अर्थ आम्ही पक्षावर नाराज नाही आणि कोणीही राजीनामा देणार नाही. भारतीय जनता पक्ष शिस्तीत चालणारा पक्ष आहे. पक्ष आदेश आमचे साठी मोठा आहे. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नाही हे स्पष्ट करतो.
त्या नंतर दोन्ही नगर परिषदेत झालेला पराभव या बाबत चर्चा अपेक्षित होती, मात्र ते देखील झाले नाही. आणि नुकतेच पाचोरा नगर परिषद गटनेता निवडीत देखील पक्षाचे ज्येष्ठ नेते ,पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. आणि आता भाजपाच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक निवड करताना कोअर कमिटीत आम्ही काहीजण असताना आम्हाला विश्वासात आणि जेष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता त्यांना डावलून परस्पर निर्णय घेऊन स्वीकृत नगरसेवक पदी ज्या व्यक्तीने शेतकरी अनुदान घोटाळ्यात असलेले आरोपी यांचे वकील पत्र घेतले आहे ते ॲड. अविनाश सुतार यांचे नाव निश्चित केले. एकप्रकारे हा निर्णय शेतकरी विरोधातील आणि शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय असून या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक निवड आम्हाला मान्य नसून त्याचा आम्ही निषेध करतो. वास्तविक पाहता पक्षासाठी माघार घेणारे आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्यांना शब्द दिला होता यांना संधी देणे आवश्यक होते. आता जो काही निर्णय होत आहे ते दिलीप वाघ, संजय वाघ, इतर घेत असल्याचा आरोप सर्वच जुन्या पदाधिकारी केला. आहे.

0 Comments