तलाठ्यांना सजेवर राहणे सक्ती करण्यासह सात बारा उताऱ्यावर नोंदी वेळेवर नोंदविण्यासाठी रयत सेनेचे तहसील समोर आंदोलन
चाळीसगाव प्रतिनिधी- चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील खरेदी विक्रीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी वेळेवर नोंद करत नसल्यामुळे प्रॉपर्टी धारकांना तलाठ्यांच्या सजेवर ( कार्यालय ) वारंवार चकरा मारून ही कामे होत नसल्याने अनेक प्रॉपर्टी धारकांना या समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे रयत सेनेच्या वतीने दि १२ जानेवारी २०२६ रोजी चाळीसगाव तहसील समोर ( प्रशासकीय इमारत ) शहर व तालुक्यातील तलाठ्यांना सजेवर उपस्थित राहणे सक्ती करण्यात यावे तसेच सात बारा उताऱ्यावर खरेदी विक्रीच्या नोंदी वेळेवर नोंदविण्यात याव्यात म्हणून आंदोलन करण्यात आले,
सात बारा उताऱ्यावर खरेदी विक्रीच्या नोंदी वेळेवर होत नाही त्याच बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी लागणारे कागदपत्रे तसेच शेतकऱ्यांना कर्जासाठी किंवा विविध योजनेसाठी सात बारा व विविध दाखले हे तलाठी यांच्या मार्फत मिळतात मात्र तलाठ्यांना इतर गावांचा अतिरिक्त भार दिल्या मुळे तलाठी हे नियुक्ती असलेल्या गावात थांबत नसल्याने नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या हेलपाटे मारून ही कामे वेळेवर होत नसल्याने तलाठ्यांच्या विरोधात तालुक्यात नागरिकांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी रयत सेनेला या विषयी आवाज उठवून न्याय देण्याचे मागणी केल्यानुसार रयत सेनेने चाळीसगाव प्रांताधिकारी यांना दि ९ जानेवारी २०२६ रोजी निवेदन देऊन सात बारा उताऱ्यावर खरेदी विक्रीच्या नोंदी नियमानुसार होत नाही तसेच इतर मागण्या केल्या होत्या मात्र प्रांताधिकारी व तहसीलदार साहेबांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दि १२ जानेवारी २०२६ रोजी रयत सेनेने प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले यावेळी नायब तहसिलदार शिंदे यांनी आंदोलन स्थळी येऊन रयत सेनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील असे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले,आंदोलनात रयत सेनेचे प्रदेश समन्वयक पी एन पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, अल्पसंख्यांक सेनेचे तालुका अध्यक्ष मुश्ताक शेख,तालुका उपाध्यक्ष भरत नवले,शहर अध्यक्ष शिवाजी गवळी, वाहतूक सेनेचे अध्यक्ष धनराज मराठे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, शहर कार्याध्यक्ष प्रकाश गवळी, शहर संघटक दीपक देशमुख, मेहुणबारे शाखा अध्यक्ष भगवान गजरे,प्रदीप मराठे,गंगाराम जाठ,संदीप पान पाटील, मिलिंद निकम, कृष्णा गवळी, प्रसाद गवळी, शेखर गवळी, शंकर गवळी, शिवाजी शहापूरकर, संकेत गवळी, नारायण देवर्षी, अतिश मोरे, देवा पटाईत, दादा पांगारे ,महेश महाजन, अतुल जाधव यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते,

0 Comments