*शहर स्वच्छता आणि सुरळीत पाणी पुरवठ्याला प्राधान्य = लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील*




(किशोर रायसाकडा) 

 विशेष  समिती सभापतींची निवड पिठासिन अधिकारी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या अध्यक्षतेत बिनविरोध पार पडली. या पार्श्वभूमीवर  मुख्याधिकारी दालनात निवड झालेल्या   सभापतींचा सत्कार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते तर लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर,जेष्ठ  नगरसेवक गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे ,मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्या नंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जनतेने आपल्या पक्षाला  प्रचंड  बहुमतांनी विजयी केले.  निवडून आलेले नगराध्यक्ष सह सर्व  नगरसेवकांनी  पदभार  घेऊन जनतेच्या अडीअडचणी,  पूर्ण करण्यासाठी काम सुरू करावे.  जनतेच्या कामांच्या  तक्रारी येऊ देऊ नका.  तसेच आगामी काळात शहर स्वच्छता आणि नागरिकांना  सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जाईल. त्या अनुषंगाने २३ फेब्रुवारी संत गाडगे बाबा यांच्या जयंती  निमित्त पालिकेच्या १४ प्रभागांमध्ये एक दिवस नगराध्यक्षांसह  त्या, त्या प्रभागाचे नगरसेवक स्वछ  अभियान हाती  घेऊन  नगराध्यक्ष , नगरपालिका आपल्या दारी हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असून भविष्यात शहरात जनतेच्या आरोग्यासाठी सर्व प्रभागातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक प्रभागात कॅम्प लावले  जातील. शहरात सुरळीत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन  विस्तारित वस्तीभागात आणि  गावात जनतेला पाणी देण्यासाठी आणि ही समस्या कायम स्वरुपी मार्गी लावण्यासाठी  येत्या काळात वरखेड - लोंढे धरणातून नवीन पाईप लाइन आणि  वाढती लोकसंख्या  पाहता अनियमित पाणी पुरवठा टाळण्यासाठी व पाणी  स्टोअर करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या  बांधण्याचा प्रस्ताव आहे. दुसरे असे की ज्या मालमत्ता धारकांकडे  थकीत घरपट्टी, नळपट्टी थकीत आहे .त्यांनी शासनाच्या धोरणानुसार थकबाकीवर लावले  कामात २४ टक्के व्याज आणि दंडव्याज टाळण्यासाठी एकरकमी थकबाकी भरल्यास त्यांचे व्याजमाफ करण्या साठी राज्य शासनाकडे शिफारस करणार आहोत परंतु  हा विषय आता नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या हातात नसल्याने कोणाचीही शिफारस करता येणे शक्य नसल्याने जनतेने समजून घेत  सहकार्य करावे असे आवाहन देखील आमदारांनी केले. 

 नगराध्यक्ष सुनीताताई पाटील  म्हणाल्या की,  अभूतपूर्व  बहु मतांनी विजय मिळाला आहे 

नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, जनतेच्या समस्या कडे दुर्लक्ष होणार नाही.

या वेळी विषय समित्यांवर निवड झालेले- उप नगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सतीश चेडे, सौ. एरंडे, रहेमान तडवी यांचा सत्कार  करण्यात आला.

या  बैठकीला १४ प्रभागातील २८   नगरसेवक, नगर सेविका, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उप मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, बांधकाम नगर अभियंता,  शिवसैनिक, कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते.