अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पैलवान हितेश पाटील याचे सुवर्णपदक



बँकॉक (थायलंड) येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 पार पडली. मलेशिया, थायलंड ,श्रीलंका आणि भारत या  देशांच्या सहभागातून ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती.  


भारताचा संघ मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झाला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात आले. १२५ किलो गटात पै.हितेश अनिल पाटील यांची निवड झाली होती, तर वरिष्ठ गटात पै.हितेश पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.  


अंतिम फेरीत थायलंडच्या पैलवानावर मात करत जळगाव जिल्ह्याचा पैलवान हितेश पाटील यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. पै.हितेश पाटील हा महाराष्ट्र केसरीसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे 


आशियाई सुवर्णपदक विजेते व मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया चे सरचिटणीस प्रा. पै. अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला.


या यशामुळे भारतीय कुस्तीपटूंना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.हितेश पाटील हे पाचोरा शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांचे मावस पुतणे आहेत