*पाचोरा कन्या विद्यालयात*
*माता - पालक सभा उत्साहात*
पाचोरा... येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली शाळेत दिनांक 21 जानेवारी रोजी माता पालक सभा व संक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती रूपालीताई जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार, पाचोरा नगर परिषदेच्या बांधकाम समिती सभापती सौ. प्रियंका ताई पाटील, खडकदेवळा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री प्रमोद गरुड, संस्थेचे विश्वस्त हर्षजीतराजे पवार, उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविकात शहरातील एकमेव कन्या शाळेच्या प्रगतीचा आलेख सादर केला. पालकांच्या वतीने सौ. निकिता दराडे, सौ. कविता दिलीप पाटील, रेखाताई गजानन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेविका सौ. प्रियंका ताई पाटील यांनी माता-पालक व विद्यार्थिनी यांना समयोचित उद्बोधन मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक अंबालाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने माता पालकांसाठी संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, यासह विविध खेळ घेण्यात आले. विजेत्या मातांना बक्षीस व संक्रांतीचा वाण भेट देण्यात आला. या निमित्ताने नूतन वर्षाच्या स्वागत समारंभात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना मेडल्स प्रमाणपत्र व लेखन साहित्य देऊन गौरवण्यात आले. प्रा. अंकिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती पायल पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. प्रतिभा पाटील, सुरेखा बडे, संगीता बाविस्कर, अश्विनी मेश्राम, उमेश कडलग, शिवराम पाटील, शकील खाटीक, धनराज धनगर यांनी परिश्रम घेतले.

0 Comments