*अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार*
पाचोरा येथील तीन जणांवर गुन्हा दाखल ; दोन अटकेत ,तिसरा फरार!
पाचोरा प्रतिनिधी -
पाचोरा शहरात एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्प वयीन मुलीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरोपी पवन संजय परदेशी, प्रथमेश पाटील यांनी काकण बर्डी परिसरात आणि अंतुर्लि शिवारातील शेतात अत्याचार केले तसेच तिसरा आरोपी विकी उर्फ शिवाजी राजपूत याने वारंवार तिचा पाठलाग करून लज्जा येईल असे कृत्य करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या फिर्यादी वरून पाचोरा पोलिस ठाण्यात या तिघांवर भादवी २०२३ चे कलम ७०(२),६४( आय), ६४(एम),७८,७४,३५२,सह ५(जी), ५(एल)८,६, १२ प्रमाणे एपीआय कल्याणी वर्मा यांचे समक्ष फिर्यादीची गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक योगेश गणगे करीत आहे.पोलिस सूत्रांच्या माहिती नुसार या प्रकरणी दोन आरोपी पोलिसांच्या अटकेत असून तिसरा फरार आहे.

0 Comments