*शिवसेनेच्या विजया मध्ये लाडक्या बहिणीचा सिंहांचा वाटा=सुनिताताई पाटील* 



आ किशोर आप्पा पाटील 

 नगराध्यक्ष,  एकही नगरसेवकांनी चौकटी  बाहेर जाऊन काम करू नये! आमदारांची तंबी!!!


पाचोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा जल्लोषात!

*गजानन पाटील*

पाचोरा प्रतिनिधी 

 राजमाता माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून तालुक्यातील बचत गटांच्या महिलांचे मार्गदर्शन शिबिर आणि  पाचोरा नगर परिषद  लोकनियुक्त नगराध्यक्ष, सौ सुनीताताई किशोर पाटील उपनगराध्यक्ष किशोर गुणवंतराव बारवकर यांचे  पदग्रहण आणि शिवसेनेचे १४ प्रभागातील नगरसेवकांचा सत्काराचा सोहळा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री  ना .गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेत तर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील  मानसिंगका मैदानावर दि. ३ जानेवारी शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रचंड उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ  बाबासाहेब आंबेडकर, सावित्री बाई फुले बाळासाहेब ठाकरे  यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. 

या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, बाजार समिती सभापती तथा नगरसेवक गणेश पाटील, शिवसेना न .पा. गटनेते सुमित पाटील,  माजी  नगराध्यक्ष, नूतन नगरसेवक संजय गोहिल, नगरसेवक प्रवीण ब्रम्हणे, सतीश चेडे, संदीप राजे  माजी उपनगराध्यक्ष  शरद पाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमबापू पाटील महिला पदाधिकारी ॲड ललिता पाटील, यांचे सह प्रभागातील नवनिर्वाचित  नगरसेवक, नगरसेविका ,स्विय्य सहाय्यक राजेश पाटील यांच्या सह शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसैनिक, तालुक्यातील बचत गटांच्या महिला, शहराच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषण शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. 

पाचोरा नगर परिषद निवडणुकीत पाचोरा शहराच्या जनतेने आमदारांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून जो ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिल्या बद्दल आमदार किशोर पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, न. पा.गटनेते सुमित किशोर पाटील यांनी व्यासपीठावर जनतेचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त केले.

*नगराध्यक्षा सौ सुनीताताई पाटील* यांनी भाषणात म्हणाल्या की, ही निवडणूक सोपी आणि साधी नव्हती. मात्र शहराच्या सुजाण , हुशार जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्व, कर्तृत्व विकास कामा वर विश्वास ठेवून  मतदान केले तर दुसरीकडे लाडक्या बहिणींचा ८० टक्के वाटा या ऐतिहासिक विजयात आहे. माझ्या कार्यकाळात मी जनहिताच्या कामांवर आणि खास करून महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ,जनतेला दररोज पाणी देण्याच्यासाठी  पाणीवाली बाई म्हणून माझी नवीन ओळख निर्माण करणार असून माझे पती आमदार किशोर आप्पा पाटील यांना संघर्ष योद्धा म्हणून पदवी देत असून त्यांच्या मार्गदर्शनात शहराच्या विकासाचा कसरतीचा रथ पुढे नेणार आहे.

*आ किशोर आप्पा पाटील* अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले की, मी आज पर्यंत अनेक निवडणुका जनतेच्या विश्वासावर आणि विकासकामांच्या बळावर जिंकत आहे  मी गेल्या पंचवीस वर्षांपासून राजकीय कुस्त्या खेळत आहे मात्र यंदाची पाचोरा - भडगाव नगर परिषदेची निवडणुकीची कुस्ती साधी नव्हती. एकी कडे बलाढ्य शक्ती आणि माझे सर्व राजकीय विरोधक मला माझ्या विरोधात लढले मात्र मी जनतेच्या विश्वासावर दंड थोपटले आणि माझा हा दंड  थोपटण्याचा पॅटर्नचा  आवाज राज्यभर गाजला. मला विरोधकांवर फारसे बोलायचे नाही. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आणि शिवसेनेला ऐतिहासिक विजय दोन्ही शहरात दिल्याचे आभार मानतो. तसेच माझ्या मायबाप जनतेने राजकीय कुस्तीत माझी आजपर्यंत पाठ  लागू दिली नाही  जनता खंबीरपने माझ्या  पाठीशी उभी राहिली आहे. येणाऱ्या पाच वर्षांसाठी जनतेने दिलेल्या सत्तेचे नगराध्यक्ष, नगरसेवकांनी उत्कृष्ट कामगिरी करून जनसेवेची विकास कामे करून परतफेड करावी. सत्तेतील एकही नगरसेवकाने  चौकटी बाहेर जाऊन कमी करू नये असा इशारा देखील आमदारांनी दिला. राजकारणात संघर्षा शिवाय मजा नाही. अंगावर येणाऱ्या विरोधकांना मी  अंगावर घातला दंड थोपटून केव्हाही तयार आहे. मी संघर्ष योद्धा तर नगराध्यक्षा सुनीताताई ह्या पाणी  वाल्या बाई म्हणून नाव कमावतील तसेच येणाऱ्या काळात मी माझ्या लाडक्या बहिणींना सर्वार्थाने सक्षम आणि त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संकल्प   केला असून सोलर सिस्टिमची ऊर्जा  दीदी उपक्रम हाती घेतला आहे .या योजनेच्या माध्यमातून जनतेला शासकीय सबसिडी, कर्ज पुरवठा करून घरबसल्या सोलर सिस्टिमसाठी ऊर्जा दीदी काम करणार आहे.

*ना.गुलाबराव पाटील* यांनी अध्यक्षीय भाषणात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद विकास कामांसाठी राज्य सरकार, एमजिपी मधून  पाहिजे ती मदत निधी देण्याची ग्वाही दिली. तसेच आमदार किशोर पाटील आणि नगराध्यक्षा सुनीताताई पाटील यांनी शहराला दररोज पाणी देण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे त्यासाठी नवीन डी पीआर आराखडा तयार करण्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार सभापती गणेश पाटील यांनी मानले.

-------------------------

सत्कार सोहळा पार पडल्या नंतर ना.गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा सुनीताताई पाटील, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक  वाजत गाजत , फटाक्यांच्या आतिषबाजीत पालिकेचा पदभार घेण्यासाठी निघाले तत्पूर्वी मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना  माल्यार्पण आणि म. फुले स्मारकावर   अभिवादन करून नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सुनीताताई पाटील यांनी पालकमंत्री, आमदार  यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते पालिकेचा पदभार स्वीकारला आहे.