*सुतार समाजाच्या सभागृहासाठी पंधरा लाखांचा निधी देणार आ किशोर पाटील*
मंदिरासाठी पाच लाख ; ओपनस्पेस सुशोभीकरणाची ग्वाही !
पाचोरा प्रतिनिधी - सृष्टीचे निर्माता भगवान श्री
विश्वकर्मा जयंती निमित्त पाचोरा शहरातील सुतार समाजाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती आणि नियोजित मंदिर भूमिपूजन कार्यक्रम नंदनवन सिटी कॉलनी भागात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, प्रभागाचे नगरसेवक सूरज वाघ, स्वीकृत नगरसेवक अविनाश सुतार सुतार समाजाचे जेष्ठ पदाधिकारी संतोष नाना मिस्तरी,बी.टी. मामा मिस्तरी, अध्यक्ष भगवान मिस्तरी व्यासपीठावर होते.
कार्यक्रमापूर्वी आद्य दैवत सृष्टीनिर्माता भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमांचे पूजन, नंदनवन सिटी परिसरात सुतार समाजाच्या नियोजित समाज मंगल कार्यालय फलक अनावरण आणि नियोजित मंदिर जागेचे विधिवत भूमिपूजन लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी समाजाचे अध्यक्ष आणि सकल सुतार समाजाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या समाज सभागृह आणि विश्वकर्मा मंदिरासाठी आमदारांनी मदत करावी अशी विनंती आणि मागणी करण्यात आली.
सुतार समाजाच्या मागणीला आमदार किशोर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भाषणात सांगितले की, मी विधानसभा निवडणुकीत सर्वच मोठे, लहान समाजांच्या सभागृह, मंगल कार्यालय यासाठी निधी देण्याचे वचन दिले होते आणि दिलेला शब्द पाळत आहे. त्या नुसार मी आमदार निधीतून सुतार समाजाच्या मंगल कार्यालय सभागृह यासाठी आमदार निधीतून पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा आणि आश्वासन देतो. शिवाय भगवान श्री विश्वकर्मा यांच्या मंदिरासाठी माझे कडून पाच लाख रुपये देत आहे. तसेच या समाज कार्यालयाच्या शेजारील ओपन स्पेस जागा देखील सुतार समाजाला आणि परिसरातील नागरिकांना उपयोगी पडेल या दृष्टीने विकास निधीतून नगरपरिषदेच्या माध्यमातून सुशोभीकरण करणार असल्याची ग्वाही दिली. आमदारांनी समाजाच्या हितासाठी, उत्कर्ष साठी जो निधी आणि मदत जाहीर केली त्याचे सुतार समाजाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून आमदारांचे आभार मानले. या वेळी समाजाचे पदाधिकारी मनोज अहिरे, कैलास मिस्त्री, राकेश मिस्त्री,किशोर मिस्त्री, योगेश मिस्त्री, धनेश्वर मिस्त्री, अमोल मिस्त्री,सचिन मिस्त्री यांचे सह समाजाचे जेष्ठ , महिला युवा, युवती कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,आभारप्रदर्शन समाजाचे जेष्ठ बी. टी. मामा मिस्त्री यांनी केले. नंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला.

0 Comments