*पाचोरा शहरात नगरपरिषद आपल्या दारी*



स्वच्छता मोहीम व तक्रार निवारण शिबिराचा  शुभारंभ


पाचोरा - शहरात दि.न २६ जानेवारी  पासून  नगराध्यक्षा सौ. सुनिता ताई किशोर आप्पा पाटील यांच्या संकल्पनेतून पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने ‘नगरपरिषद आपल्या दारी’ स्वच्छता मोहीम व तक्रार निवारण शिबिर  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर मोहीम दि. २६ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेचा शुभारंभ मा. आमदार किशोरआप्पा पाटील  यांच्या हस्ते  शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील आशीर्वाद ड्रिमसिटी येथून करण्यात आला. ही मोहीम  मुख्याधिकारी  मंगेश देवरे  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागात पहिल्या दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी तक्रार निवारण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तात्काळ व प्रभावी निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये स्वतः  नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोर आप्पा पाटील उपनगराध्यक्ष  किशोर गुणवंत बारावकर, आरोग्य सभापती  सतीश चेडे, जेष्ठ  नगरसेवक गणेश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण ब्राह्मणे, नगरसेवक सुमित पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील, नगरसेवक शरद पाटे , गंगाराम पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे,उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, आरोग्य निरीक्षक  श्री नकवाल, नगर अभियंता भय्यासाहेब, पाटील  विविध  विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून घेत  त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

आतापर्यंत सदर मोहीम पाचोरा शहरातील  प्रभाग क्रमांक १, २ व ३ मध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आली असून, या दरम्यान प्रभागातील  मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, गटारी तसेच सार्वजनिक ओपन स्पेसची संपूर्ण स्वच्छता  करण्यात आली आहे.

नगरपरिषद आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचा  थेट सहभाग वाढवून पाचोरा शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याचा नगरपरिषदेचा ठाम संकल्प असून, या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.