तांदुळवाडी विद्यालयाला मिळाली शासनाच्या SQAAF मूल्यांकनात अ+ श्रेणी प्राप्त
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनात कै.यादव दगडू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला मानाची 'अ+' श्रेणी प्राप्त झाली आहे.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकमेव विद्यालयास पहिल्याच फेरीत अ + श्रेणी प्राप्त झाली आहे ही गौरवास्पद बाब आहे आणि महाराष्ट्रात खूपच कमी ग्रामीण भागातील विद्यालयांना पहिल्या फेरीत अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे त्यात कै.यादव दगडू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी तालुका भडगाव चा समावेश आहे. ही कामगिरी म्हणजे विद्यालयीन संपूर्ण टीमचे परिश्रम, नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, जसे स्क्रॅच कोडिंग शिक्षण,ATL लॅब, संगणक लॅब, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, सुसज्ज स्वच्छतागृह,नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, स्वच्छ व सुसज्ज विद्यालय परिसर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2 मध्ये जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक हे सर्व पालक-शिक्षक सहकार्य यामुळेच हा मानाचा मुकुट विद्यालयाला मिळाला
आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श म्हणजे तांदुळवाडी विद्यालय होय. या यशासाठी विद्यालयाचे प्राचार्य स्वप्निल आर निकम, लिपिक आर एन निकम,शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQF) चे समन्वयक एस आर निकम, जी जी वराडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी खूप मेहनत घेतली. हे सर्व काम रात्रंदिवस एक करून प्रथम मुदतीतच पूर्ण केले. त्यानंतर शासनाकडून बाह्यमूल्यांकन समिती गठीत करून संपूर्ण दिवसभर या समितीने १. अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन, २. पायाभूत सुविधा, ३. मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व, ४. समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव, ५. व्यवस्थापन, सनियंत्रण आणि प्रशासन, ६. लाभार्थ्यांचे समाधान या सहाही क्षेत्रांची पाहणी, पडताळणी करून शासनास गोपनीय अहवाल सादर केला. त्यातून कै.यादव दगडू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास अ + श्रेणी प्राप्त झाली.
विद्यालयाचा विकास करत असताना प्राचार्य, संस्थेचे चेअरमन संगिता ताई निकम, सचिव डॉ रविंद्र निकम सर्व संचालक सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक विकास पाटील साहेब व माध्यमिक कल्पना चव्हाण मॅडम जळगाव, भडगाव गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, केंद्रप्रमुख कैलास देवरे, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व कर्मचारी यांचेही मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील प्राचार्य, लिपिक, व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अ+ श्रेणी म्हणजे अभिमान विद्यालयाचा आणि गौरव शिक्षणाचा. SQF अ+ श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल शासनाने अभिनंदन केले आहे. संस्थेचे चेअरमन,सचिव व संचालक, प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्वच स्तरावरून विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

0 Comments