क्रिप्टो करन्सीत अमळनेरच्या डॉक्टराला एक कोटी 65 लाखांचा गंडा 



क्रिप्टो करेंसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल असे प्रलोभन दाखवून अमळनेर येथील एका 70 वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची तब्बल एक कोटी 65 लाख 70 हजार 204 रुपयात ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 


*नेमके काय आहे प्रकरण*

अंमळनेर येथील यशवंत नगरतील रहिवासी असलेले 70 वर्षीय डॉक्टर अनिल नथू शिंदे यांना झासी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला तिने शिंदे यांना विश्वास संपादन करून त्यांना क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या नफ्याचे आम्ही दाखवले, त्यासाठी तिने डॉक्टर शिंदे यांना लिंक पाठवून संबंधित नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. 

सुरुवातीला डॉक्टर शिंदे यांनी 70 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यावर त्यांना चक्क एक लाख 53 हजार 21 रुपयांचा नफा दाखवण्यात आला. हा परतावा मिळाल्याने शिंदे यांचा विश्वास बसला त्यानंतर आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. 29 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या अवघ्या 21 दिवसाच्या कालावधीत डॉक्टर शिंदे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण एक कोटी 65 हजार 57 हजार 204 रुपये गुंतवले मात्र एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठले. डॉक्टर शिंदे यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात झासी प्रवीण पाटील. तिथे साथीदार प्लिकेशन चालवणारे आणि संबंधित बँक खातेदार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत. 

क्रिप्टो करन्सीने प्रलोभनेदेत खानदेशातील अनेक उद्योजक डॉक्टर यांना कोट्यावधीचा गंडा घातल्याचे बोलले जात आहे.