*प्रभाग क्रमांक १० व ८ मधील विकास कामांना गती.....*
(पाचोरा)=प्रभाग क्रमांक १० व ८ मधील बऱ्याच दिवसांपासून रखडलेले रस्त्यांचे काम आता वेगाने सुरू करण्यात आलेले असून आज दि. ०२/०३/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता गाडगे बाबा नगर मधील चिंचेचा झाडापुढील परिसरातील अमृत नगर व त्याला लागून असलेला परिसर या ठिकाणच्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष किशोरअप्पा बारावकर, गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब,
नगरसेवक गणेश पाटील, नगरसेवक योगेश पाटील (दादू वकील), नगरसेविका जयश्री नरेंद्र पाटील, नगरसेविका मनिषा संजय एरंडे, नरेंद्र पाटील(बालाजी ग्रुप), संजय एरंडे आप्पा, गंगाराम पाटील, सुमित सावंत, राजेंद्र पाटील, राम केसवाणी, साळुंखे माऊशी, रत्नपारखी माऊशी व प्रभाग क्रमांक १० व ८ मधील नागरिक उपस्थित होते त्यावेळी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते व यापुढे देखील दुपटीच्या वेगाने रखडलेले कामे पूर्णत्वास नेवू व प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध राहू असा विश्वास प्रभाग क्रमांक १० व ८ च्या नगरसेवक व नगरसेविकांनी दिला.

0 Comments