समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे ..केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
वाशीम येथे राज्यस्तरीय
पत्रकार अधिवेशनाचे थाटात उद्घाटन....!
वाशिम : समाजात घडणाऱ्या घटना व मुद्द्यांवर सत्य आणि निसपक्ष दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे .पत्रकार हा समाज आणि शासन यांच्यामधील संवाद साधणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे. पत्रकारांनी शासनाच्या प्रत्येक कामकाजावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे .समाजाला जागृत करणे चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देणे ही भूमिका त्यांनी कायम ठेवावी. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आव्हान केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी वैकंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर वाटाणे लॉन वाशिम येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार व पदाधिकारी सन्मान पार पडला. सदर सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्यांनी वरील प्रतिपादन केले.
स्थानिक वाटाणे लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संम्मेलनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प. दिनकरराव वाटाणे होते. विशेष आशिर्वाद उपस्थिती म्हणून आयोध्या मंदिर कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांचे बंधू भागवताचार्य प.पु. रमाकांत व्यास, श्री महाकाली संस्थान कासोळा देव येथील प.पु. गजानंद माऊली, तर विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे,, नगराध्यक्ष अनिल केंदळे, उपाध्यक्ष राजु भांदुर्गे, , वाशिम अर्बंन बँक अध्यक्षा श्रीमती शिला राठी, डॉ. हेमराज लाहोटी, , माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, , मुख्य समन्वयक डॉ. हरीश बाहेती , स्वागताध्यक्ष गिरधारीलाल सारडा, आयोजन समिती कार्याध्यक्ष शिवाजीराव वाटाणे, सह स्वागत अध्यक्ष देवेंद्र खडसे पाटील,ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे,व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, , प्रदेश प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव, रिपाइं आठवले गट जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी, , प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, किशोर रायसाकडा, कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, पश्चिम विदर्भ प्रमुख अनुप कुमार भार्गव, सुरेश खोसे, रवींद्र गुरव,विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे, अमरावती विभागीय अध्यक्ष सुनिल फुलारी, चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष दिपक ढोके समवेत मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री वैकुंठधामवासी सो.स्नेहलता सोमानी यांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण व दीप प्रजलवन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना महाराष्ट्र भूषण, भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना संत सेवाश्री पुरस्कार, दिनकरराव वाटाणे यांना वारकरी सेवा पुरस्कार, राधेश्याम चांडक विदर्भ भूषण, सुलतानपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर हेमराज लाहोटी यांना विदर्भभूषण,डॉ. हरिष बाहेती व डॉ. सरोज बाहेती विदर्भ भूषण, ह.भ.प. पंकजपाल महाराज विदर्भ गौरव, श्रीमती शिलाताई राठी जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार, देविदास पाटील राऊत गौसेवक पुरस्कार, जेष्ठ साहित्यीक स्व. भाष्करराव मुंढे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार, समाजसेवक मिलींद भावसार उद्योजक पुरस्कार, गोपाल गिरधारीलाल सारडा उद्योजक पुरस्कार, स्वप्नील देवेंद्र खडसे पाटील उद्योजक पुरस्कार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे यांना आरोग्यसेवक, ज्येष्ठ पत्रकार जालना येथील नंदलाल राठी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार,अमोल पाटणकर वाशिम जिल्हा भूषण, वास्तुविशारद हर्षद शर्मा वाशिम रत्न पुरस्कार, शेखर बंग समाजसेवक पुरस्कार, मोहित कर्नावट युथ आयकॉन पुरस्कार, अविनाश मारशेटवार सेवारत्न पुरस्कार, शाम सवाई आदर्श समाजसेवक पुरस्कार, प्रविण पट्टेबहादुर यांना सेवारत्न , मनीष डांगे यांना दिव्यांग सेवक, समाजसेविका सौ संगीता वसंत इंगोले,योग प्रशिक्षक सौ.दीपा रवि वानखेडे, वास्तु विशारद सौ.अर्चना मेहकरकर, योग प्रशिक्षक सौ . तारा राजू कलवार यांना नारीरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. आकर्षक सन्मान चिन्ह , सुवर्णपदक व वामनराव पै यांची विश्व कल्याण पार्थना सर्वांना प्रदान करण्यात आली. तर आदर्श संस्था म्हणून केशव गौरक्षण मंगरुळपीर ,छाया फाऊंडेशन वाशिम, वारकरी सेवा संस्था वांगी, पिरॉमिड स्पिरिचुअल सोसायटी मुवमेंट वाशिम, तिरुपती सेवा गृप परिवार, वाशिम यांना सन्मानीत आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने किशोर रायसाकडा, नयन मोंढे, राकेश खराडे, शंकर बोरघरे, अनुप भार्गव, गणेश देगावकर, नागेश आदापुरे, दशरथ चव्हाण, पोपटराव गव्हांदे, वैभव स्वामी, राजेंद्र शिंदे, राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक म्हणून नवचेतना पुरस्कार तर पत्रकार भारती सोमाणी व वृषाली टेकाळे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी भागवताचार्य प.पू.रमाकांत व्यास यांनी जीवनात परिवार व समाजातील लोकांची आपले वागणे कशा प्रकारचे ही गोष्ट महत्वपूर्ण आहे, मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती घरातील आई-वडील व ज्येष्ठांचा अपमान करत असेल तर त्याचे मंदिरात जाणे व्यर्थ आहे असे सांगून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका वटवावी असे आव्हान केले. परमपूज्य गजानंद माऊली यांनी माणूस धनाने नव्हे तर मनाने मोठा पाहिजे. समाजामध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाईट कृत्य घडणार नाही कुणाचेही मने दुखावले जाणार नाही याची दक्षता घेणे जरुरी आहे निंदकाला सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजे कारण त्याच्यामुळे आपल्याला चांगले कार्य करण्याचे बळ मिळते. लोकशाहीच्या नैतिक मूल्याचे रक्षण करणे हे पत्रकारांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तधनंतर द्वितीय सत्रात पत्रकारांचा डिएनए काय व अजितदादा पवार यांच्या मृत्यूचे राजकारण तर होत नाही ना? व सायबर युगातील माध्यमे आणि मुल्यनिष्ठ पत्रकारीता या विषयावर ज्येष्ठ संपादक डॉ राजेश राजोरे यांनी सत्य, संयम व समाजहित हाच पत्रकाराचा खरा डीएनए आहे, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा यांच्या निधनानंतर ज्या प्रकारचे वृत्तांत मीडियाने केले त्यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अशा प्रकारच्या चुकीच्या संकल्पना समाज माध्यमातून पोहोचवणे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी नेहमी सत्याची बाबी उचलून धरावी असेही त्यांनी सांगितले. पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्याची माहिती सर्वांसमोर ठेवली. पत्रकारांसाठी शासनाने लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका पत्रकार योजना सुरू करण्याची मागणी केली, अधिवेशनामध्ये त्यांनी विविध ठराव मांडले त्याला सर्वांनी एकमताने मान्यता प्रदान केली. सदर कार्यक्रमामध्ये सहकार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. श्री संत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळ, रनचंडिका बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित श्री संत सावता माळी क्रीडा मंडळ यांच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले, श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संस्थेच्या वतीने वारकरी दिंडी द्वारा मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, श्री विश्वमांगल्य महासभा वतीने लेझीम पथकाच्या द्वारे मान्यवरांचे स्वागत केले, सदर प्रात्यक्षिक व सादरीकरणाने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले याकरिता गुरुवर्य अंबादास इंगोले , राजू राऊत, दामोदर इंगोले, केशव इंगोले ,प्रवीण राऊत, संगराताई चुंबळकर यांचे सहकार्य लाभले. संत व मान्यवर यांचे आगमन पवन शर्मा यांच्या वतीने वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट द्वारे रॉयल विंटेज कारच्या माध्यमातून धमाकेदार पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश सोमानी, संचालन नेहा काळे व राशी राजपुरोहित तर आभार सुरेश टेकाळे यांनी मानले. सदर संमेलनाला संपूर्ण राज्यभरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित पत्रकार बांधव यांना आकर्षक बॅग,डायरी ,पेन, दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली. वाशिम येथे कित्येक वर्षानंतर राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून ते यशस्वीपणे पार पडल्याने वाशिमचे नाव संपूर्ण राज्यात झळकले आहे. या यशस्वी अधिवेशनाची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे..




0 Comments