*दहशत=रात्री शस्त्रांचा धाक वाळू माफियांचा  ट्रॅक्टरचा थरार = ग्रामस्थांची झोप उडाली, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे आक्रमक*



पाचोरा = तालुक्यातून गिरणा नदी पात्रातून कुरंगी, नांद्रा, माहिजी,व वरसाडे या परिसरातून रात्री डंपर टिपर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक जोरात सुरू आहे या वाळू माफियांनी या परिसरात प्रचंड दहशत व धाक निर्माण केला आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विद्यार्थी व महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनोद तावडे वाळू माफिया यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देऊन ही चोरटी वाहतूक तात्काळ थांबण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य पदमसिंह पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, कुरंगी मा.सरपंच गजानन पवार,परधाडे सरपंच सचिन पाटील,वेरुळी सोसायटी चेअरमन विजय पाटील, युवासेना ता उपप्रमुख ज्ञानेश्वर रायगड,माहिजी ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, ग्रामस्थ अमोल जाधव, दिपक गायकवाड, कुरंगी उपसरपंच सुनील पाटील,,सोनू परधाडे आदी उपस्थित होते. 

नदीपात्रातून होणारे उपशामुळे केवळ पर्यावरणाची हानी होत नाही तर मानवी जीवनालाही धोका निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरचा कर्कश आवाजामुळे लहान मुले व वयोवृद्धची झोप उडत आहे. अवैध वाळू वाहतुकीला ग्रामस्थांनी विरोध केल्यास त्यांना चाकू सारख्या शस्त्रांचा धाक दाखवून धमकावले जाते. काही दिवसापूर्वी दहिगाव  येथील लोकेश नामक युवकास डंपरचा कट लागल्याच्या कारणावरून वाळू माफियांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली होती. यापुढे अशी काही घटना घडल्यास याला सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

💥*आंदोलनाचा इशारा=शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे*

पाचोरा महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सर्व गोरख धंदा सुरू आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही हा रात्रीस खेळ सुरूच आहे. असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जरी वाळू माफियांची अवैध वाळू वाहतूक बंद नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा आक्रमक पवित्रा विनोद तावडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.