*बड्या नेत्यांच भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक, महिलेवर अत्याचाराचा आरोप, पेन ड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ...!*



(नासिक सरकर वाडा)

बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा आणि स्वतःला कॅप्टन म्हणविणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे महिलावर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्योतिष व्यवसायातून त्याने अनेकांना गंडा घातत्याचा आरोप असून त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये ५८आक्षेपार्ह व्हिडिओ  आढळले आहेत. गुन्हे शाखेने अटक केली असून. या प्रकरणाने हायप्रोफाईल वर्तुळात खळबळ उडाली आहे.


*💥 काय आहे प्रकरण?💥*

नाशिक मध्ये सरकार वाडा पोलिसात अशोक खरात यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 35 वर्षे महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे बुधवार 18 मार्च रोजी खरात याला तीन वाजता गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले यासंदर्भात सध्या अधिक चौकशी सुरू आहे धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असून त्यांची सत्यता पकडण्यात येत आहे.


*💥कोण आहे हा खरात?💥*


नाशिक मधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्र म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात त्याचं खरं रूप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्ही मधील निवृत्त अधिकारी आहे शिवनी का ट्रस्टच्या संकेतस्थळा वरील माहितीनुसार पुणे मध्ये 22 वर्षाच्या कारकिर्दीत खरात ने 154 देशांचे आहेत त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती परंपरा संस्कृति नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती याचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते. 

खरातच्या या कृत्यामुळे हाय प्रोफाईल नेटवर्क सातारकर झाल्याचे कळते.