पाचोरा तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा, उभे पिके आडवी, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी...
पाचोरा तालुक्यातील काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसाने ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
तालुक्यातील सांगवी, वाघुलखेडा, खडकदेवळा, सारोळा या परिसरात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे ही राहून घेतला आहे.सांगवी येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील उभे असलेले मका पिक जमिनदोस्त झाले आहे.यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहेत.

0 Comments