*प्रांताधिकारी यांना दोन लाखांची लाच स्विकारतांना अटक*
पुणे-(प्रतिनिधी)
जुन्नर-आंबेगांव
विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद शिंदे यांना दोन लाख रूपयाची लाच घेतांना पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. बिल्डींग बांधकामाच्या पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे शिंदे यांनी दोन लाखाची लाच मागितली होती. ही लाच स्विकारतांना शिंदे यांच्यासहलिपीक राहुल खैरनार यांना मंचर येथील कार्यालयात एसीबीने ताब्यात घेतले.गोविंद शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अगस्ती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील-गायकर यांचे जावई आहेत. जुन्नरला येण्यापुर्वी ते शिर्डी येथे प्रांताधिकारी होते.

0 Comments