पाचोरा पोलिसांनी दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त पाचोरा पोलिसांची दबंग कारवाई 




                                                                                पाचोरा, प्रतिनिधी   

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांच्या दारुबंदी कायद्याखाली जास्तीत जास्त प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेले हवालदार दिलीप वाघमोडे, अशोक हटकर, पो. काँ. योगेश पाटील यांचे पथक तयार करुन मिळालेल्या माहितीनुसार पथक रवाना करण्यात आले होते. त्या नुसार, वाघुलखेडा शिवारात हिवरा नदीपात्रात याकुब गनी हुसैन रिचवाले (वय - ४२ वर्षे) रा. सिंधी ता. भुसावळ ह. मु. वाघुलखेडा ता. पाचोरा हा गैरकायदा तिन दगडांची चुल माडून त्यावर पत्री ड्रम ठेवून त्या खाली भट्टी लावून एकुण १६ हजार रुपये किंमतीचे १५० लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व १० लिटर गावठी हातभट्टी तयार दारु गाळताना व कब्जात बाळगताना मिळुन आल्याने त्याचेविरुदध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच तारखेडा शिवारात धरणाचे खाली भगवान रघुनाथ भिल रा. तारखेडा ता. पाचोरा हा गैरकायदा तिन दगडांची चुल माडून त्यावर पत्री ड्रम ठेवून त्या खाली भट्टी लावून एकुण २३ हजार रुपये किंमतीचे २०० लिटर गुळ, मोह, मिश्रित कच्चे पक्के रसायन व ३० लिटर गावठी हामभट्टी तयार दारु गाळताना व कब्जात बाळगताना मिळुन आला. म्हणुन त्याचेविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील प्रमाणे दोन जणांवर दारुबंदी कायद्याखाली वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शना खाली प्रभावी कारवाया करुन दोन गुन्हे दाखल करण्यात आले असुन दोन्ही गुन्हयाचे तपास पाचोरा पोलीस करित आहेत.