पिंपळगाव हरे परिसरात अवैधंदयावर: सहा पोलिस उपनिरीक्षक कल्याणी वर्मा यांची कारवाई 



पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत देशी-विदेशी दारू, गुटखा साठेबाजी तसेच सट्टा चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


मंगल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या एका घरावर छापा टाकत पोलिसांनी मंगलबाई प्रदीप निकम, सिद्धांत प्रदीप निकम व अमित प्रदीप निकम यांच्या ताब्यातून ८,१६२ रुपयांचा सुगंधित तंबाखू व पानमसाला तसेच देशी-विदेशी दारू जप्त केली. याशिवाय कालिकामाता चौकात विजय आत्माराम जगताप हा गांजा सेवन


करताना आढळून आला. कुराड खुर्द येथे पांडुरंग फकीरा तिरमल हा सट्टा चालवत असल्याचे उघडकीस आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कर्मचारी अभिजीत निकम, किरण ब्राह्मणे, तात्याबा नागरे, शैलेश चव्हाण, राहुल बेहरे, भारत प पाटील, नामदेव इंगळे, अमोल पाटील, श्याम हटकर यांनी सहभाग घेतला.