पाचोरा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; विनयभंग प्रकरणात आरोपी दोषी
पाचोरा (प्रतिनिधी) — पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणात पाचोरा येथील मा. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
गुन्हा क्रमांक 204/2023 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ) अंतर्गत दाखल प्रकरणात मा. जी. एस. बोरा मॅडम यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात फिर्यादी सुभाष तुकाराम सूर्यवंशी असून आरोपी बिस्मिल्ला इमाम मुसलमान (RCC नं. 178/2025) आहे.
दि. 31 मार्च 2026 रोजी न्यायालयाने CRPC कलम 248(2) नुसार आरोपीला दोषी ठरवले. तसेच आरोपीस फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून 25,000 रुपये, 1,000 रुपयांचा दंड आणि न्यायालय उठेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणात एकूण 7 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तपासी अधिकारी म्हणून PSI अमोल पवार यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता प्रशांत बी. भावसार यांनी युक्तिवाद केला.
ही कारवाई SDPO बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनच्या सपोनि कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पैरवी अधिकारी म्हणून HC 1234 राजेंद्र पाटील आणि केस वॉच म्हणून पो. ना. 1281 दिपक पाटील यांनी काम पाहिले.

0 Comments