अंत्योदय लाभार्थी योजनेतील मयत कार्ड धारकांच्या नांवाने धान्य उचलुन १० लाखाचा अपहार करणाऱ्या दहिवदच्या दोन रेशन दुकानदारांविरूध्द गुन्हा दाखल
अमळनेर :- सन २०१२ ते
२०१६ या कालावधीत मयत सभासदांच्या नांवे धान्य उचलून सुमारे ९ लाख ६२ हजार २०८ रूपये किंमतीच्या गव्हासह तांदुळाचा अपहार केले प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील स्वस्त धान्य दुकानदार रमेश काशिनाथ पाटील (दुकान क्र.१४५) व कोकिळाबाई
वासुदेव माळी (दुकान क्र. १४६) यांच्याविरूध्द जीवनावश्यक वस्तु सेवा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी अंत्योदय लाभार्थी सुमनबाई मच्छींद्र पाटील, गुणवंताबाई आत्माराम माळी, सोनाबाई देवचंद माळी या मयत लाभार्थीच्या नांवे अंत्योदय व बीपीएल योजनेतून धान्य उचलले तसेच मंजुर क्षमतेपेक्षा जास्त लाभार्थीची नांवे वाढवून
त्यांच्या नांवे देखील गहु, तांदुळ उचलुन गहु, तांदुळाचा अपहार के ला. याबाबत शामकांत जयवंतराव पाटील यांनी पुराव्यासह तक्रार दाखल के ल्यानंतर वरील दोन्ही दुकानांचे परवाने रद्द झाले होते.
चाळीसगांव तालुक्यातील सोनगाव येथील स्वस्त धान्य दुकान चालकाने अंत्योदय व बीपीएल योजनेतील मयत
झालेल्या ४० लाभार्थीच्या नांवाने योजनेतील गहु, तांदुळ सतत दोन ते तीन वर्षे उचलुन या गहु, तांदुळाची काळ्या बाजाराने विक्री करून शासनाची फसवणूक केली आहे.
सदरच्या गंभीर प्रकाराच्या अनुषंगाने तहसिलदार चाळीसगांव यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करून
जवळपास चार ते सहा महिने झाले असुनही सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याची हिंमत राजकीय दबावाखाली तहसिलदार चाळीसगांव व जिल्हा पुरवठा अधिकारी जळगांव करीत नाहीत म्हणून हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात येत आहे.

0 Comments