७/१२ वरील कालबाह्य नोंदी करण्यासाठी ८५ हजारांची लाच पाचोऱ्याच्या स्टॅम्प वेंडर अटकेत
तलाठ्याने सांगितले सांगितले स्टॅम्प वंडरला ला पैसे द्या , तडजोडीनंतर 90 हजारांवरुन 85 हजारांची मागणी.
पाचोरा (किशोर रायसाकडा)
गेल्या काही दिवसा अगोदरच पाचोरा येथील स्टॅम्प वेंडर अतिरिक्त पैसे घेत असल्याचे प्रकरणी स्टॅम्प वेंडरवर कायदेशीर कारवाई प्रकरण ताजे असतानांच.
पाचोरा तहसील कार्यालयातील कामासाठी शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या मोबदल्यात 85 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खाजगी स्टॅम्प वेंडर समाधान सुभाष पाटील राहणार कुऱ्हाड खुर्द तालुका पाचोरा यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी केलेल्या कारवाईनंतर ही कारवाई करण्यात आली.
तक्रदारांच्या आजोबा ममराज हजारी पंजारी यांच्या नावावर कुऱ्हाड खुर्द येथे असलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी तलाठी नकुल काळकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी 80 हजाराची लाच मागून पुढील कामासाठी स्टॅम्प वेंडर समाधान पाटील यांना भेटून पैसे देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने ७ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
पंचासमक्ष पडताळणीत समाधान पाटील यांनी सुरुवातीला 90 हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर 85 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. अशी माहिती एसीबीने दिली.
तक्रारदारांच्या काकांनी आरोपी व तलाठी विरुद्ध केलेल्या तक्रारीची माहिती दिल्यानंतर आरोपीने तक्रारदाराच्या घरी जाऊन पैसे देण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे नियोजित सापळा कारवाई होऊ शकली नाही.
याप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करून समाधान पाटील याला सायंकाळी अटक करण्यात आली . पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. उपाधीक्षक सचिन सान्दखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तपास करीत आहेत. या कारवाईमुळे पाचोरा तहसील परिसरात खळबळ उडाल्याचे कळते.

0 Comments