(पाचोरा प्रतिनिधी)
दिनांक 4 मार्च 2025 रोजी अमळनेर येथे उलट तपासणी करत असताना अॅड. प्रशांत बडगुजर यांनी साक्षीदाराला विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्याने संबंधित साक्षीदाराने न्यायालयाच्या आवारातच अॅड. प्रशांत बडगुजर यांना मारहाण केली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निषेहास्पद आहे. सर्व वकील बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज, दिनांक 10 मार्च 2025 रोजी, पाचोरा येथील सर्व वकील बांधवांनी दुपारच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच, दुपारी 2 वाजता पाचोरा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.
वकील सुरक्षेसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित "अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा" लागू करावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, वकिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वकिलांच्या विरोधात अन्यायकारक कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून लादले जाणार नाहीत, याची खात्री सरकारने द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.
न्यायसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित ठोस पावले उचलावीत आणि वकिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक कायदे लागू करावेत, अशी मागणी सर्व वकिलांतर्फे करण्यात आली.

0 Comments