सहाय्यक कामगार आयुक्त संतोष कोकाट यांना निलंबित करण्याची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी



मुंबई-


वांद्रे मुंबई येथील, दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे कुरण बनत चाललेल्या श्रमिक संघ अधिनियम १९२६ चे सहाय्यक कामगार आयुक्त संतोष ग. कोकाट यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांनी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी केलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, संतोष


कोकाट यांनी शासकीय अभिलेखांवर चुकीच्या प्रक्रियेने तपासणी न करता नोंदणी केलेली आहे, त्यांनी तक्रार अर्जाना उत्तरीत न करता सार्वजनिक हिताच्या विरोधी कृती केलेली आहे. शासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य दुर्लक्ष, श्रमिक संघ १९२६ चे अज्ञान, माहिती अधिकार कायद्याचे अज्ञान, तसेच कायद्याच्या तरतुदींचा अयोग्य वापर केल्याने त्यांच्या सेवेतील गैरवर्तनाचा विचार करून त्यांच्यावर तत्काळ निलंबन करून प्रशासकीय कारवाई करण्यात


यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे.


सहाय्यक कामगार आयुक्त संतोष कोकाट यांनी केलेल्या चुकीच्या नोंदींमुळे विविध संस्थांच्या नावाचा गैरवापर होऊन मूळ संस्थांच्या नावलौकिक व गुडविला धोका निर्माण होऊन भारतीय संविधानातील मूलभूत हक्क कलम १९ (१) (क) चे उल्लंघन झाल्याने अशा संस्थांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे.


मुळात फसवणूक करून व तथ्य लपवून नोंदणी केलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी कायद्यात पुरेसा आधार असताना देखील सहाय्यक कामगार आयुक्त संतोष कोकाट यांनी त्यांच्या कर्तव्याकडे हेतू पुरस्सर व अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचे वारंवार निदर्शनास आलेले आहे.


त्यांनी केलेल्या नोंदीमध्ये भ्रष्टाचाराचा वास येत असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई, निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केलेली आहे.