गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा पोलिसांचा रूट मार्च...





पाचोरा शहरात येणाऱ्या गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने पाचोरा पोलिसांकडून आज सायंकाळी भव्य रूट मार्च काढण्यात आला.


शहरातील मुख्य मार्ग, आठवडे बाजार, बाहेरपुरा, सोनार गल्ली, गांधी चौक, रेल्वे स्टेशन रोड या भागातून पोलिस पथकाने संचलन केले. या वेळी पोलिस  पथकाच्या सुरेल नादात व शिस्तबद्ध पद्धतीने पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांनी पथसंचलन केले.


रूट मार्च दरम्यान नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून पोलिसांचे स्वागत केले. काही ठिकाणी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. रूट मार्चामुळे शहरात उत्सवमूर्तींच्या मिरवणुका, गर्दी व धार्मिक कार्यक्रमांच्या काळात शांतता व सुरक्षिततेची खात्री मिळाल्याचे नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.


या संचलनात पोलिस निरीक्षक श्री राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी,

 श्री ए.पीआय संजय निकम,

 श्री पी.एसआय योगेश गणगे,

 श्री पी.एसआय कैलास ठाकूर, श्री पी.एस

.आय सुनील पाटील, श्री पी.एस.आय कृष्ण घायाळ 

 कर्मचारी, गुन्हे शाखा पथक तसेच होमगार्ड सहभागी झाले होते. "सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहनही यावेळी करण्यात आले.