पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक . राहुल कुमार पवार यांनी शहरातील नागरिकांना बँक व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे


.


शहरातील विविध बँकांमध्ये रोख रक्कम जमा किंवा काढण्यासाठी नागरिक—विशेषतः ज्येष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग—मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक दिशाभूल करून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करतात, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे बँकेतून पैसे आणताना अथवा भरणा करताना नागरिकांनी जास्तीत जास्त सावधगिरी बाळगावी, असे निरीक्षक पवार यांनी सांगितले.


नागरिकांनी रोख रक्कम मोटरसायकलच्या डिकीत ठेवू नये. त्याऐवजी ती सुरक्षित बॅगेत किंवा आपल्या खिशात ठेवावी. बॅग घेऊन जाताना वाहनाला लावताना किंवा मोबाईलवर बोलताना दुर्लक्ष करू नये. अनेकदा काही व्यक्ती "आपली वस्तू खाली पडली आहे" किंवा "थांबा" असे सांगून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी कोणत्याही अपरिचिताच्या बोलण्याला बळी न पडता आपली रोख रक्कम सुरक्षित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.


शहरातील नागरिकांनी जागरूक राहून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस निरीक्षक . राहुलकुमार पवार यांनी केली आहे.