खोटी माहिती दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखलखोटी माहिती दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी भागातील एका युवकाने डायल 112 वर फोन करून “उद्या जळगावमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे” अशी खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री सुमारे 8 वाजून 23 मिनिटांनी डायल 112 वर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांकडे मदत मागत जळगाव शहरात उद्या बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. मात्र तपासाअंती ही माहिती निराधार व खोटी असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी कॉल करणारा आरोपी किरण लक्ष्मण पाटील (वय 28, रा. कृष्णापुरी, पाचोरा) असल्याचे समोर आले. त्याने स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून (9271458799) पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची दिशाभूल झाली असल्याने आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 212 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.