सी.सी.आय खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू


.


पाचोरा प्रतिनिधी:-


पाचोरा-भडगाव खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी कपास किसान अॅपचा उपयोग


पाचोरा, ता. २८ ऑगस्ट :

सन २०२५-२६ या हंगामातील कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळ (सी.सी.आय) मार्फत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव येथील खरेदी केंद्रे लवकरच सुरु होणार असून यंदाच्या हंगामात कापसाला हमीभाव ८११० रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला आहे.


सभापती गणेश भिमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील तसेच संचालक मंडळ यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी **‘कपास किसान अॅप’**च्या माध्यमातून नावनोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.


 नोंदणी प्रक्रिया


३० ऑगस्ट २०२५ पासून शेतकरी गुगल प्लेस्टोअरवरून कपास किसान अॅप डाउनलोड करू शकतील.


नोंदणीची मुदत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ अशी राहणार आहे.


या अॅपद्वारे शेतकरी आपल्या सोयीनुसार कापूस विक्रीची तारीख आणि खरेदी केंद्र निवडू शकतील.


 आवश्यक कागदपत्रे


नोंदणी करताना शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :


1. सन २०२५-२६ चा पिक पेरा दाखवणारा ७/१२ उतारा



2. आधारकार्ड



3. मोबाईल क्रमांक



4. पासपोर्ट साईज फोटो



 शेतकऱ्यांना होणारे फायदे


या ऑनलाइन प्रक्रियेने शेतकऱ्यांना केंद्रावर गर्दी करावी लागणार नाही. घरबसल्या मोबाईलवरून नोंदणी करता येणार असल्याने वयोवृद्ध व्यक्तींना खरेदी केंद्रावर आणण्याचा त्रास टळणार आहे. शिवाय, विक्रीसाठीची तारीख शेतकरी स्वतः निश्चित करू शकणार असल्याने खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ होईल.



 संपर्कासाठी क्रमांक


नोंदणी प्रक्रियेत काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :


पाचोरा : ९७३०६२६१३७ / ९५९५८३७५८९ / ८६५७६१०००७ / ७७७४८६५५०४


भडगाव : ९७६७१०४७४५ / ७७९८८२०४३१



सभापती गणेश भिमराव पाटील यांनी शेतकरी बांधवांना आवाहन केले की, "सी.सी.आय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया घरबसल्या करता येईल, त्यामुळे सर्वांनी वेळेत नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा."