कुरंगी–बांबरुड गटात शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे यांच्या कार्याची जोरदार चर्चा.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
कुरंगी–बांबरुड जिल्हा परिषद गटात शिवसेना तालुकाप्रमुख विनोद भिकन तावडे यांच्या कार्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. लोकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि थेट प्रशासनाशी दोन हात करण्याची त्यांची पद्धत जनतेच्या पसंतीस पडत आहे.
अलीकडेच माहेजी ग्रामस्थांनी रेती ठेकेदारांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या वेळी ठेकेदाराने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. उपस्थित असलेल्या तावडे यांनी ठेकेदाराला थेट प्रत्युत्तर देत तेथून हाकलून लावले. या घटनेमुळे ग्रामस्थांना आत्मविश्वास मिळाला.
त्यानंतर नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर निष्काळजीपणावरही तावडे यांनी आवाज उठवला. राणीचे बांबरुड येथील संतोष पवार यास कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तो उपचारासाठी केंद्रावर पोहोचला, मात्र तेथे डॉक्टर अनुपस्थित होते तसेच रेबीजची लस उपलब्ध नव्हती. यामुळे संतप्त तावडे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
याशिवाय तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा पंचायत समिती येथे कुठलाही नागरिक भेटला तरी तावडे स्वतः त्यांची विचारपूस करून त्यांची कामे करून देतात. या आपुलकीच्या स्वभावामुळे आणि संघर्षशील कार्यपद्धतीमुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
ग्रामस्थांचा विश्वास आहे की, “आपल्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता म्हणजे विनोदभाऊ तावडे,” असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच कुरंगी–बांबरुड गटासह पाचोरा तालुक्यात त्यांच्या कार्याची चर्चा होत आहे.

0 Comments