*तरुणांना व्यसनांपासून मुक्त करून निरोगी व सुसंस्कृत पिढी घडविन्याचा मानस...* पि.एस.आय. योगेश गणगे



नगरदेवळा वार्ताहर: सोनु परदेशी

पाचोरा येथील लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था (अनाथालय) चालविणारे प्रसिद्ध भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर हे पाचोरा येथे किर्तन सप्ताह राबवुन संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक पिढी घडविण्याचे काम करीत आहेत. त्याठिकाणी मनोगत व्यक्त करीत निर्व्यसनी व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी आपणही हातभार लावावा या हेतूने १००८  तरुणांना तुळशी माळ गळ्यात घालून निर्व्यसनी करण्याचा संकल्प पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी केला.

किर्तन सप्ताहात बोलतांना ते म्हणाले की आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीला वेगळे स्थान आहे आपण जीवन जगत असताना भगवंताची भक्ती केली पाहिजे. आपल्या धर्मामध्ये रामायण दासबोध असे अनेक अनेक ग्रंथ आहेत. सर्व ग्रंथांमध्ये फक्त ज्ञानेश्वरी अशी आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात भागवतगीता आहे. भगवंत आणि मानव यांच्यामध्ये झालेला तो संवाद आहे. आणि तो संवाद ज्ञानेश्वरीच्या रूपाने पाकृत मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी तो आपल्यामध्ये आणला. म्हणूनच या ज्ञानेश्वरी चे पारायण करत असताना संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे, भगवंत एकमेव कृपाळू आहे. भगवंताने जो भक्ती मार्ग दाखविला त्या मार्गाने जात भगवंताचे नामस्मरण करावे आणि भगवंताची भक्ती करावी. आध्यात्मच्या मार्गाने जिवन जगल्याने तरुणांची आंतरीक शक्ती वाढेल, वाईट संगीतून मार्ग दिसेल, व्यसनांपासून दूर राहण्यास मदत मिळेल ज्याने एक सशक्त आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करता येईल असे सांगितले.

तसेच नगरदेवळा येथील सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे महाराज यांनी देखील नगरदेवळा परिसरातील जवळपास २५ ते ३० तरुणांना तुळशीमाळ घालुन व्यसनमुक्त केले असुन योगेश महाराज लक्ष्मीमाता वारकरी शिक्षण संस्था व मी ३०० पेक्षा अधिक तरुणांना तुळशीमाळ घातली असून पाचोरा तालुक्यातील १००८ तरुणांना तुळशीमाळ घालुन व्यसनमुक्त करण्याचा मानस असल्याचे पोलिस उप योगेश गणगे यांनी सांगितले.